चेन्नईच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत पंजाब किंग्जला गुंडाळले. रविंद्र जडेजाने 3 तर तुषार देशपांडे, सिमरजीत यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 1 विकेट घेत पंजाबची अवस्था 18 षटकात 9 बाद 123 धावा केल्या.
चेन्नई सुपर किंग्जने पंजाबची 4 बाद 68 धावा अशी अवस्था केली आहे. जडेजा आणि सँटनरने दोन धक्के देत शशांक सिंह (27 धावा) आणि प्रभसिरमन सिंग (30 धावा) या सेट बॅट्समनला बाद केलं.
तुषार देशपांडेने पंजाब किंग्जला दुसऱ्याच षटकात दोन धक्के दिले. त्याने जॉनी बेअरस्टोला 7 धावांवर तर रिली रूसोला शुन्यावर बाद केलं. पंजाबची अवस्था 2 षटकात 2 बाद 9 धावा अशी झाली.
हर्षल पटेल शार्दुल ठाकूर 11 चेंडूत 17 धावा करून बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर धोनीला शुन्यावर त्रिफळा उडवला. त्यामुळं चेन्नईची अवस्था 7 बाद 150 धावा अशी झाली. जडेजाने 43 धावांची खेळी करत चेन्नईला 164 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र अर्शदीपनं देखील 20 व्या षटकात त्याला बाद केलं. अखेर चेन्नईने 20 षटकात 9 बाद 168 धावांपर्यंत मजल मारली.
चेन्नई सुपर किंग्जने 13 व्या षटकात शतकी मजल मारली. मात्र त्यांचा निम्मा संघ गारद झाला. हर्षल पटेलने डॅरेल मिचेलला 30 धावांवर बाद केलं. त्यानंतर सॅम करनने मोईन अलीला 17 धावांवर बाद केलं. चेन्नईची अवस्था 12.4 षटकात 5 बाद 103 धावा अशी झाली आहे.
चेन्नई सुपर किंग्जने 7 षटकात 1 बाद 69 धावा करत चांगली सुरूवात केली होती. मात्र लेग स्पिनर चाहरने आठव्या षटकात पहिल्या चेंडूवर ऋतुराजला 32 धावांवर बाद केलं. त्यानंतर शिवम दुबेला दुसऱ्याच चेंडूवर बाद करत चेन्नईला दुसरा धक्का दिला.
अजिंक्य रहाणेने अर्शदीपला दमदार स्ट्रेट ड्राईव्ह मारत आपल्या इनिंगची सुरूवात केली. मात्र याच षटकात अर्शदीपने यॉर्करवर अजिंक्य रहाणेला बाद केलं अन् सीएसकेला पहिला धक्का दिला.
ऋतुराज नाणेफेक गमावण्यावर म्हणाला की मी 10 वेळा नाणेफेक हरली अन् त्यातील 5 सामने जिंकला हे सकारात्मक चित्र आहे.
ऋतुराज गायकवाडने पुन्हा एकदा नाणेफेक गमावली आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज हे एकमेकांशी 29 वेळा भिडले आहेत. त्यातील 15 वेळा चेन्नईने विजय मिळवला तर 14 वेळा पंजाबनं चेन्नईला मात दिली आहे.
याआधी 1 मे रोजी दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता. ज्यामध्ये पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जला एकतर्फी पराभूत करून धक्का दिला. त्यामुळे या सामन्यात सीएसके मागील पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने उतरणार आहे, तर पंजाब किंग्जची नजर आणखी एका विजयाकडे असेल.
Punjab Kings vs Chennai Super Kings IPL 2024 :
चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जचा 28 धावांनी पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 168 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरा पंजाबला 20 षटकात 9 बाद 139 धावाच करता आल्या. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी केली.
त्याने 43 धावांची महत्वपूर्ण खेळी केलीच त्याचबरोबर 3 विकेट्स घेत चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तुषार देशपांडे आणि सिमरजीत सिंगने प्रत्येकी 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. पंजाबकडून प्रभसिमरनने 30 तर शशांक सिंहने 27 धावा केल्या.
पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकात 9 बाद 169 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 23 चेंडूत 43 धावांची खेळी केली. तर कर्णधार ऋतुराज गायकवाडने 21 चेंडूत 32 तर डॅरेल मिचेलने 30 धावांचे योगदान दिले.
पंजाबकडून राहुल चाहर आणि हर्षल पटेल यांनी भेदक मारा करत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीपने 2 विकेट्स घेत त्यांना चांगली साथ दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.