Philip Salt KKR vs RCB esakal
IPL

Philip Salt KKR vs RCB : 6,0,6,6,W,1W कर्ण शर्मानं चोपलं! अखेर सॉल्टनं सर्वात महागड्या खेळाडूची वाचवली लाज; पाहा VIDEO

अनिरुद्ध संकपाळ

Philip Salt Last Ball Run Out Video KKR vs RCB IPL 2024 : आयपीएलच्या 36 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर बंगळुरूनं केकेआरला त्यांच्याच घरच्या मैदानात चांगलीच झुंज दिली. केकेआरने प्रथम फंलदाजी करताना 222 धावा केल्या होत्या. आरसीबीला विजयासाठी 223 धावांची गरज होती. आरसीबीने 221 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीच्या कर्ण शर्मानं जवळपास सामना जिंकून दिला होता. मात्र स्टार्कनं त्याची विकेट घेतली त्यानंतर फिल्प सॉल्टने फर्ग्युसनला अप्रतिम प्रकारे धावाबाद करत सामना टाय होण्यापासून वाचवला.

आरसीबीच्या कर्ण शर्माने शेवटच्या षटकात मिचेल स्टार्कला तीन षटाकार मारत सामना 2 चेंडूत 3 धावा असा आणला होता. त्यानंतर स्टार्कनं पाचव्या चेंडूवर कर्ण शर्माला बाद करत सामना एका चेंडूत 3 धावा असा आणला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर लॉकी फर्ग्युसनने दोन धावा काढत सामना सुपर ओव्हरमध्ये नेण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न विकेटकिपर फिल्प सॉल्टने मोडून काढला. त्यानं फर्ग्युसनला डाईव्ह मारत धावबाद केलं. सॉल्टच्या या विकेटकिपिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शेवटच्या षटकात काय झालं?

आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क गोलंदाजी करण्यासाठी आला. त्याला 21 धावा डिफेंड करायच्या होत्या. समोर कर्ण शर्मा अन् मोहम्मद सिराज होता.

पहिला चेंडू - कर्ण शर्मानं मिचेलचा यॉर्करवर षटाकर मरात चेंडू सीमारेषेच्या बाहेर टोलवला. आता आरसीबीला सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूत 15 धावांची गरज होती.

दुसरा चेंडू - स्टार्कने डॉट बॉल टाकत केकेआरच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या.

तिसरा चेंडू - कर्ण शर्माने कव्हर्सवरून स्टार्कला षटकार खेचत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आता सामना 3 चेंडूत 9 धावा असा आला होता.

चौथा चेंडू - स्टार्कनं पुन्हा यॉर्करचा प्रयत्न केला. मात्र कर्ण शर्मानं पुन्हा एकदा षटकार मारत स्टार्कला घाम फोडला. आता सामना 2 चेंडूत 3 धावा असा आला होता.

पाचवा चेंडू - अखेर स्टार्कनं कर्ण शर्माला कॉट अँड बोल्ड केलं. सामना आता 1 चेंडू अन् 3 धावा असा आला. दोन धावा केल्या तर सामना सुपर ओव्हरमध्ये जाणरा होता.

सहावा चेंडू - लोकी फर्ग्युसन क्रिजवर आला होता. त्यानं एक्स्ट्रा कव्हरला चेंडू टोलवला अन् दोन धावा घेण्यासाठी जोर लावला. मात्र रमणदीपनं थ्रो केला. हो थ्रो विकेटच्या थोडा दूर होता. मात्र विकेटकिपर फिल्प सॉल्टनं चेंडू पकडून स्टम्पच्या दिशनं हवेत डाईव्ह मारला अन् फर्ग्युसनला धावबाद केलं. अशा प्रकारे केकेआरने आरसीबीचा 1 धावेने पराभव केला.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT