KKR vs LSG, IPL 2024, Philip Salt Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 28 वा सामना रविवारी (14 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात सामना झाला. ईडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने 8 विकेट्सने विजय मिळवला.
कोलकाताच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज फिल सॉल्टने मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात केवळ फलंदाजीतच शानदार कामगिरी केली नाही, तर स्टंपमागे अफलातून यष्टीरक्षणही केले. त्याने आधी यष्टीरक्षण करताना दोन चांगले झेल घेतले.
त्याने लखनौच्या मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन या दोन धोकादायक फलंदाजांचे झेल घेतले. त्यातही स्टॉयनिसचा घेतलेल्या झेलाने त्याने अनेकांना प्रभावित केले. त्याच्या या झेलाचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
झाले असे की या सामन्यात लखनौ संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. यावेळी मार्कस स्टॉयनिस पाचव्या क्रमांकावर 11 व्या षटकात फलंदाजीला उतरला होता. त्याने 2 चौकार ठोकत आपला हेतूही स्पष्ट केला होता.
परंतु, 12 व्या षटकात वरूण चक्रवर्ती गोलंदाजीला आला. त्याने या षटकातील चौथा चेंडू ऑफ स्टंपच्या जवळ टाकली. यावर स्टॉयनिस कव्हरच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु, चेंडू त्याच्या बॅटची आतली कड घेऊन त्याच्या थायपॅडला लागला आणि मागे गेला. यावेळी सॉल्टने चूक न करता उजव्या बाजूला सूर मारला आणि एका हाताने चेंडू पकडला.
त्यामुळे स्टॉयनिसला माघारी परतावे लागले. स्टॉयनिसने 5 चेंडूत 10 धावाच केल्या. यानंतर सॉल्टने 20 व्या षटकात मिचेल स्टार्कच्या चेंडूवर पूरनचाही 45 धावांवर झेल घेतला. लखनौने या सामन्यात 20 षटकात 7 बाद 161 धावा केल्या होत्या आणि 162 धावांचे आव्हान
कोलकातासमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताकडून सलामीला फलंदाजीला उतरलेल्या सॉल्टने 47 चेंडूत 89 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले.
तसेच त्याने कर्णधार श्रेयस अय्यरबरोबर (38) तिसऱ्या विकेटसाठी 120 धावांची नाबाद भागीदारीही केली. त्यामुळे कोलकाताने 162 धावांचे आव्हान 15.4 षटकात 2 विकेट्स गमावत पूर्ण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.