IPL 2023 | prithvi shaw 
IPL

IPL 2023: टीम इंडियाबाहेर... आयपीएलमध्येही फेल! 'या' दिग्गज खेळाडूची कारकीर्द बरबादीकडे...

भारतीय संघाचा खेळाडू खराब फॉर्मशी झुंजत आहे आणि आता कारकीर्द आली धोक्यात...

Kiran Mahanavar

IPL 2023 Prithvi Shaw : आयपीएल 2023चा हंगाम दिल्ली कॅपिटल्ससाठी काय चांगला म्हणावं असं चालला नाही. सलग तीन सामने पराभूत झाल्याने गुणतालिकेत संघ शेवटच्या स्थानावर आहे. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 50 धावांनी, गुजरात टायटन्स विरुद्ध 6 गडी राखून आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध 57 धावांनी पराभव झाला

तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 199 धावा केल्या. दुसरीकडे दिल्लीच्या सलामीच्या जोडीकडून चांगली सुरुवात करून संघाला मजबूत करेल अशी अपेक्षा होती. पण प्रत्येक वेळेप्रमाणे पुन्हा एकदा त्यांचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ सपशेल अपयशी ठरला.

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ याला राजस्थानविरुद्धच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून प्लेइंग 11 मध्ये आला. मात्र हा खेळाडू पुन्हा एकदा सपशेल अपयशी ठरला. शॉ या सामन्यात खातेही उघडू शकला नाही आणि ट्रेंट बोल्टने त्याला बाद केले. यापूर्वी लखनौविरुद्ध शॉ 9 चेंडूत केवळ 12 धावा करून बाद झाला होता. त्याचवेळी हा खेळाडू गुजरातविरुद्ध 7 धावा करून परतला.

पृथ्वी शॉ भारतीय संघातून बऱ्याच दिवसांपासून बाहेर आहे. शॉ 2020 मध्ये भारतासाठी शेवटची कसोटी खेळला होता. 2021 मध्ये त्याने शेवटचा टी-20 आणि ODI सामना खेळला. देशांतर्गत सामन्यांमधील या खेळाडूची कामगिरी पाहून त्याला संघात परत बोलावण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र हा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे.

पृथ्वी शॉच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत 66 डावात फलंदाजी केली आहे. यादरम्यान त्याने 24.72 च्या सरासरीने 1607 धावा केल्या. शॉने या कालावधीत 12 अर्धशतके ठोकली आहेत, तर त्याची सर्वोत्तम धावसंख्या 99 धावा आहे. त्याचवेळी तो 147 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत आहे. या खेळाडूला बऱ्याच दिवसांपासून एकही मोठी इनिंग खेळता आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: संविधान नसतं तर..? राहुल गांधींनी फुले आंबेडकरांची आठवण काढत केली RSS वर टीका

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

SCROLL FOR NEXT