Atharva Taide Punjab Kings vs Lucknow Super Giants : लखनौ सुपर जायंट्सने ठेवलेल्या 258 धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने देखील दम दाखवला. त्यांनी लखनौच्या प्रत्युत्तरात सर्वबाद 201 धावा केल्या. लखनौने सामना 56 धावांनी जिंकत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. पंजाबकडून अथर्व तायडेने सर्वाधिक 66 धावा केल्या. मात्र त्याला साथ देणाऱ्या फलंदाज आक्रमक फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाले. लखनौकडून नवीन उल हकने 3 तर यश ठाकूरने 4 विकेट्स घेतल्या.
लखनौ सुपर जायंट्सने ठेवलेल्या 258 या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरूवात खराब झलाी होती. पंजाबने 31 धावात 2 विकेट्सही गमावल्या होत्या. त्यांची पॉवर प्लेमधील संथ सुरूवात पाहून पंजाब पराभूत मानसिकतेने सामना खेळत आहे की काय असे वाटत होते.
मात्र पंजाबचा युवा डावखुरा फलंदाज मराठमोळा अथर्व तायडेने लखनौच्या गोलंदाजांना झुंज देण्यास सुरूवात केली. त्याने सिकंदर रझासोबत 78 धावांची भागीदारी रचत संघाचे शतक 12 व्या षटकात धावफलकावर लावले. दरम्यान, तायडेने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. मात्र यश ठाकूरने सिकंदर रझाला 36 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर अथर्वही 36 चेंडूत 66 धावा करून रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर बाद झाला.
अथर्व बाद झाल्यानंतर सॅम करन (11चेंडूत 21 धावा) आणि जितेश शर्मा (10 चेंडूत 24 धावा) यांनी तुफानी खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठी धावसंख्या, चेंडू आणि धावांमधील वाढते अंतर यासमोर या खेळी तोकड्या पडल्या. पंजाबकडून यश ठाकूरने 37 धावात 4 विकेट्स घेत त्यांचा डाव 201 धावांवर संपुष्टात आणला.
लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जच्या गोंलंदाजांची त्यांच्याच घरच्या मौदानावर विक्रमी धुलाई करत 257 धावांचे टार्गेट उभारले. विशेष म्हणजे आयपीएल इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी 2013 मध्ये आरसीबीने सर्वाधिक 263 धावा ठोकल्या होत्या. आता लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या उभारली. लखनौकडून मार्कस स्टॉयनिसने सर्वाधिक 77 धावा केल्या. मेयर्सने 53 आणि पुरनने 45 तर आयुष बदोनीने 43 धावा केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.