PBKS vs RCB Live Score 
IPL

PBKS vs RCB : आरसीबीच्या गोलंदाजांनी सामना आणला खेचून, प्ले ऑफच्या आशा ठेवल्या जिवंत

अनिरुद्ध संकपाळ

पंजाबची मोठी मजल मात्र निम्मा संघ गारद 

पंजाबचा शशांक सिंह अजून लढतोय त्यानं पंजाबला 12.4 षटकात 5 बाद 141 धावांपर्यंत मजल मारून दिली.

PBKS vs RCB Live Score : पंजाब किंग्जचंही चोख प्रत्युत्तर; रूसोची आक्रमक खेळी

आरसीबीच्या 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने देखील दमदार सुरूवात केली. त्यांनी 10 षटकात 120 धावांपर्यंत मजल मारली. रिली रूसोने 27 चेंडूत 61 धावा चोपल्या. मात्र आरसीबीकडून कर्ण शर्माने देखील चांगला मारा करत 2 विकेट्स घेतल्या. त्याला स्वप्निल सिंहने 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली.

PBKS vs RCB Live Score : विराटचं शतक हुकलं मात्र आरसीबीनं उभारल्या 241 धावा

विराट कोहलीने अर्धशतकानंतर आपला गिअर बदलला. त्यानं 47 चेंडूत 92 धावा चोपत संघाला 200 धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानं आपल्या खेळीत 6 षटकार आणि 7 चौकार मारले. कॅमरून ग्रीनने 46 तर दिनेश कार्तिकने 7 चेंडूत 18 धावा करत आरसीबीला 20 षटकात 7 बाद 241 धावांपर्यंत पोहचवलं.

विराट कोहलीचे अर्धशतक, आरसीबी 150 पार 

विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण करत आरसीबीला देखील 150 धावांच्या पार पोहचवलं. आरसीबीने 15 षटकात 3 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली.

थोड्याच वेळात सामना सुरू होणार 

पावसाने थोडी उसंत घेतली आहे. त्यामुळे कव्हर्स हटवण्यात आले आहेत. सामना 8.55 ला सुरू होणार आहे.

PBKS vs RCB Live Score : सामन्यात व्यत्यय! आरसीबीचा धडाका पावसामुळे थांबला

आरसीबीने 10 षटकात 3 बाद 119 धावा केल्यानंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला. खेळ थांबला त्यावेळी आरसीबीचा सलामीवीर विराट कोहली 23 चेंडूत 42 धावा करून नाबाद होता. त्याला साथ देण्यासाठी कॅमरून ग्रीन मैदानात आला होता.

रजत पाटीदारचे दमदार अर्धशतक, आरसीबी शतक पार 

रजत पाटीदारने दमदार फलंदाजी करत 21 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यामुळे आरसीबीने 10 षटकात 119 धावांपर्यंत मजल मारली. मात्र सॅम करनने त्याला 55 धावांवर बाद करत आरसीबीला तिसरा धक्का दिला.

PBKS vs RCB Live Score : विराटनंतर विल जॅक्सची फटकेबाजी; आरसीबीची दमदार सुरूवात

फाफ ड्युप्लेसिस 9 धावा करून बाद झाल्यानंतर आक्रमक फलंदाजी करणारा विराट कोहली आणि विल जॅक्स यांनी आरसीबीला 4 षटकात 40 धावांच्या पार पोहचवले. मात्र कावेराप्पाने आरसीबीला दुसरा धक्का देत जॅक्सला 12 धावांवर बाद केलं.

पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकली

पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबने आपल्या संघात एक बदल केला असून रबाडाच्या ऐवजी लियाम लिव्हिंगस्टोनचा संघात समावेश करण्यात आला आहे.

हेड टू हेड : PBKS vs RCB 

दोन्ही संघ आतापर्यंत 32 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. त्यातील पंजाब किंग्जने 17 वेळा सामना जिंकत आघाडी घेतली आहे. आरसीबीने 15 वेला सामना जिंकला आहेत. यंदाच्या हंगामात आरसीबीने पंजाब किंग्जला 4 विकेट्सनी मात दिली होती. या पराभवाचा बदला घेण्याची पंजाबला संधी आहे.

Punjab Kings Vs Royal Challengers Bengaluru Live Cricket Score : आरसीबीने पंजाबचा केला पराभव 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 60 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 241 धावांचे आव्हान उभारलं. विराट कोहलीने 92 धावांची दमदार खेळी केली. मात्र त्याला शतक पूर्ण करता आलं नाही. रजत पाटीदारनं 55 धावांची अर्धशतकी खेळी केली.

पंजाबने देखील दमदार फलंदाजी करत 15 षटकाच्या आत 150 धावांपर्यंत मजल मारली होती. जॉनी बेअरस्टोने 27 चेंडूत 61 धावा ठोकल्या. तर शशांक सिंहने 17 चेंडूत 37 धावा केल्या होत्या. मात्र आरसीबीच्या फिरकीपटूंनी चांगला मारा करत आरसीबीला मोठा विजय मिळवून दिला. कर्ण शर्मा, स्वप्निल सिंहने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर स्लॉग ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने 3 अन् लॉकी फर्ग्युसनने 2 विकेट्स घेतल्या.

आरसीबीने आपल्या प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवल्या असून आता त्यांना पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. पंजाब किंग्जने प्ले ऑफमधील आव्हान संपुष्टात आले असून ते इलिमनेट झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT