Punjab Kings Win Over Chennai Super Kings Benefits 9 teams IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना हा धरमशालाच्या सुंदर स्टेडियमवर रंगणार आहे. आता प्रत्येक सामन्यागणिक प्ले ऑफचे अन् गुणतालिकेचे चित्र बदलत आहे. आजचा पंजाब विरूद्ध चेन्नईचा सामना देखील याला उपवाद नाही. आजच्या सामन्यात कोणाचा विजय झाला तर कोणाचा फायदा होणार अन् कोणाला नुकसान होणार हे जाणून घेऊया.
सध्याच्या घडीला आयपीएल 2024 च्या प्ले ऑफमध्ये एकाही संघाने प्रवेश केलेला नाही. राजस्थान रॉयल्सने जरी 10 सामन्यात 16 गुण मिळवले असली तरी तेही अजून प्ले ऑफचं तिकीट मिळवू शकलेले नाहीत.
याचबरोबर कोणताही संघ अधिकृतरित्या प्ले ऑफमधून बाहेर देखील गेलेला नाही. मुंबई इंडियन्स जरी 11 सामन्यापैकी 8 सामने गमावले असले तरी ते अजून प्ले ऑफमधून बाहेर गेलेला नाही.
जर मुंबई आणि आरसीबीला प्ले ऑफ गाठण्याची फार संधी नसली तरी आजच्या सामन्यावर त्यांची थोडी फार उरलेली आशा देखील अवलंबून आहे. जर आज पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवला तर पॉईंट टेबलमध्ये जोरदार हालचाल होणार आहे.
सीएसकेने 10 सामन्यात 10 गुण मिळवले आहेत. त्यांना प्ले ऑफची आशा जिवंत ठेवण्यासाठी विजय गरजेचा आहे.
ऋतुराजच्या संघाला अजून दोन सामने तरी जिंकावे लागणार आहेत. जर ते पंजाबकडून हरले तरी त्यांचे प्ले ऑफमध्ये जाण्याच्या स्वप्नाला जोरदार धक्का बसू शकतो.
पंजाब - सीएसके सामन्याच्या निकालाचा कोणावर होणार परिणाम?
जर पंजाब किंग्जविरूद्धचा सामना चेन्नई सुपर किंग्जने जिंकला तर ते पंजाब किंग्जंविरूद्धचा सलग पाच पराभवांची मालिका खंडीत करतील. त्याचबरोबर त्यांची प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी दावेदारी देखील मजबूत होईल. त्यांचे लखनौ आणि हैदराबादशी तुलना करता रनरेट हे चांगले असल्यामुळे ते टॉप थ्रीमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. चेन्नईच्या विजयाचा फक्त चेन्नईलाच फायदा होणार आहे.
दुसरीकडं जर पंजाब किंग्जनं सामना जिंकला तर ते सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली. सीएसके सहाव्या स्थानावर घसरेल. चेन्नई हरली तर दिल्ली कॅपिटल्स आणि त्यांचे पॉईंट्स सेम होतील अन् त्यांच्या प्ले ऑफ गाठण्याच्या आशेला धक्का बसू शकतो.
पंजाबच्या विजयाचा थेट परिणाम हा गुजरात, बंगळुरू, मुंबई यांच्यासारख्या संघांवर होईल. त्यांच्यासाठी मार्ग थोडा सुकर होण्याची शक्यता आहे. हे संघ प्ले ऑफच्या शर्यतीत दुसऱ्याच्या कामगिरीवर अवलंबून आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.