IPL 2024 Hardik Pandy sakal
IPL

IPL 2024 Hardik Pandya : हार्दिकच्या नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह ; ॲरॉन फिन्च, ग्रॅहम स्मिथ आणि शेन वॉटसनची टीका

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा अनेकांनी टीका केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा अनेकांनी टीका केली आहे. दडपणाखाली तो गोंधळून जातो, तसेच तो हतबलही होतो, असे मत ऑस्ट्रेलियाचा आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार ॲरॉन फिन्च तसेच ग्रॅहम स्मिथ यांनी व्यक्त केले.

वानखेडे स्टेडियमवर कोलकता संघाविरुद्ध सामना जिंकण्याची संधी असताना मुंबई संघाला २४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर हार्दिकच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. या सामन्यात कोलकता संघाची पहिल्या सहा षटकांत पाच बाद ५७ अशी अवस्था केल्यानंतरही मुंबईला सामन्यावर पकड मिळवता आली नाही.

पंड्याने यंदाच्या स्पर्धेच प्रथमच चार षटके गोलंदाजी दिली आणि दोन विकेटही मिळवल्या; परंतु फलंदाजीत संघाला गरज असताना तो केवळ एकाच धावेवर बाद झाला. मैदानावर नेतृत्व करताना किंवा गोलंदाजीत बदल, तसेच क्षेत्ररक्षण रचना करतानाही हार्दिक हतबल झालेला दिसतो. त्याच्यावर दडपण असल्याचे स्पष्ट दिसून येतो. जेव्हा आपल्याविरोधात अशा गोष्टी घडत असतात तेव्हा अशी परिस्थिती येते, हे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत असताना मीसुद्धा अनुभवले आहे, असे फिन्चने सांगितले.

हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळताना पूर्ण मुंबई इंडियन्सचा संघच गोंधळलेल्या स्थितीत असल्याचे जाणवत आहे. तो स्वतः दडपणाखाली अडखळत आहे. त्याचा परिणाम त्याच्या खेळावर होत आहे, असे स्मिथने सांगितले. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर शेन वॉटसन यानेही हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. पाच बाद ५७ अशा स्थितीत आलेल्या कोलकता संघाला पुनरागमन करण्याची संधी हार्दिकने त्याच्या कल्पनाशून्य नेतृत्वामुळे मिळाली, असे वॉटसन म्हणाला.

निम्मा संघ एवढ्या स्वस्तात गमावल्यावर पर्यायी गोलंदाज असलेल्या नमम धीर याला गोलंदाजीसाठी कायम ठेवणे हीच मोठी चूक हार्दिकने केली. या काळात हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराला केवळ एकच षटक गोलंदाजी देण्यात आली, असे वॉटसनने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT