Sanju Samson Sakal
IPL

Sanju Samson: 'जसप्रीत बुमराहनंतर तोच...', राजस्थानच्या क्वालिफायरमधील पराभवानंतर सॅमसनने कोणाचं केलं इतकं कौतुक?

IPL 2024, SRH vs RR: संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजाचे गेल्या दोन वर्षात बुमराहनंतर तोच, असं म्हणत कौतुक केलं आहे.

Pranali Kodre

Sanju Samson on Sandeep Sharma: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील क्वालिफायर-2 सामन्यात राजस्थान रॉयल्सला शुक्रवारी (24 मे) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 36 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या पराभवामुळे राजस्थान रॉयल्सने यंदाच्या हंगामातील आव्हान संपले आहे.

दरम्यान, या सामन्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने संघाच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने वेगवान गोलंदाज संदीप शर्माचेही कौतुक केले आहे. तो असेही म्हणाला की गेल्या दोन वर्षातील संदीपची कामगिरी पाहाता जसप्रीत बुमराहनंतरचा सध्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाज तो आहे.

सॅमसन म्हणाला, 'मी संदीपसाठी खूप खूश आहे. लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर बदली खेळाडू म्हणून तो आला. त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. जर आपण आकडे पाहिले, तर लक्षात येईल गेल्या दोन वर्षात बुमराहनंतर कोणी असेल, तर तो संदीप शर्मा आहे. त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे.'

संदीप राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल 2023 मध्ये दुखापतग्रस्त प्रसिध कृष्णाच्या जागेवर बदली खेळाडू म्हणून सामील झाला होता. त्याला 2024 साठी राजस्थानने कायम केले. संदीपने गेल्या दोन वर्षात राजस्थानसाठी 22 सामने खेळताना 23 विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या एका 5 विकेट्सच्या कामगिरीचाही समावेश आहे.

याशिवाय सॅमसनने असेही म्हटले की राजस्थानने काही चांगले प्रतिभाशाली खेळाडू शोधले. तो म्हणाला,'फक्त या हंगामातच नाही, तर गेल्या तीन वर्षात आम्ही काही चांगले सामने खेळलो. आम्हाला भारतासाठी काही चांगले प्रतिभाशाली खेळाडू मिळाले.'

'रियान पराग, ध्रुव जुरेल आणि संघातील अनेक जण केवळ राजस्थानसाठीच नाही, तर नक्कीच भारतासाठीही उदयोन्मुख खेळाडू आहेत. गेले तीन हंगाम आमच्यासाठी चांगले राहिले आहेत.'

सॅमसनने क्वालिफायरमध्ये पराभवामागील कारणही स्पष्ट केले. तो म्हणाला, सनरायझर्स हैदराबादच्या फिरकीपटूंविरुद्ध राजस्थानने संघर्ष केला, हेच पराभवाचा महत्त्वाचे कारण ठरले. त्याचबरोबर दव पडण्याची अपेक्षा होती, परंतु दव पडले नसल्याचेही सॅमसनने सांगितले.

त्याचबरोबर त्याने सांगितले की हैदराबादच्या डावखुऱ्या पिरकीपटूंचे चेंडू जेव्हा थांबून येत होते, तेव्हा रिवर्स स्वीपचे प्रयत्न व्हायला पाहिजे होते आणि क्रिजचा अधिक वापर करता आला असता.

आता हैदराबादने क्वालिफायर-2 जिंकल्याने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात हैदराबादचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे.

याबाबत सॅमसन म्हणाला, चेन्नईतील परिस्थिती दोन्ही संघांना अनुकूल आहे. त्याचबरोबर सनरायझर्सची फलंदाजीची पाहाणे औत्सुक्याचे असेल, तर कोलकाताही आत्मविश्वासाने भरलेले आहेत. हा चांगला सामना होईल.

दरम्यान, अंतिम सामना रविवारी (26 मे) चेन्नईत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WTC Points Table: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाकडून हिसकावला 'नंबर वन'चा मुकूट; पर्थमधील विजयानंतर कसे आहे फायनलचे समीकरण?

Latest Marathi News Updates : युतीला एवढी मते मिळण्याची ही पहिलीच वेळ; काय म्हणाले खासदार सुनील तटकरे?

"आम्हाला आई-बाबा म्हणून निवडलंस" लेकाच्या दहाव्या वाढदिवशी रितेश-जिनिलियाने दिल्या खास शुभेच्छा , "एक उत्तम मुलगा..."

CERC Recruitment 2024: भारत सरकारने जाहीर केली नवीन भरती, 29 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

Pune: पोलिसांची कामगिरी वाचून व्हाल थक्क; स्मशानभूमीतील लाकडावरुन लावला खुनाचा तपास!

SCROLL FOR NEXT