rajasthan royals sandeep sharma news sakal
IPL

IPL 2024 : RCB विरुद्धच्या पराभवानंतर संजूच्या RR बसला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज पुढच्या सामन्यातून बाहेर

IPL 204 Rajasthan Royals : आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सने सलग चौथ्या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

Kiran Mahanavar

IPL 204 Rajasthan Royals : आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सने सलग चौथ्या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. शनिवारी रात्री जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या महत्त्वाच्या सामन्यात राजस्थानने आरसीबीविरुद्ध पाच चेंडू शिल्लक असताना सहा गडी राखून विजय मिळवला.

मात्र या विजयासह राजस्थानलाही मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. राजस्थान रॉयल्सचे सहाय्यक प्रशिक्षक शेन बॉन्ड यांनीच सामन्यानंतर ही माहिती दिली. तो म्हणाला की, वेगवान गोलंदाज संदीप शर्मा दुखापतीतून सावरत आहे, पण पुढच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता नाही.

खरं तर, राजस्थान रॉयल्सच्या वेगवान आक्रमणात संदीप शर्माची महत्त्वाची भूमिका आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संदीप शर्माने 3 षटकात केवळ 22 धावा देत एक विकेट घेतली होती. यानंतर, पुढील सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही, ज्यात त्याने 4 षटकात 9 च्या इकॉनॉमीसह 36 धावा दिल्या. सध्या तो एनसीएमध्ये पुनर्वसनावर आहे आणि आरसीबीविरुद्धचा सामनाही खेळला नाही.

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत राजस्थान रॉयल्सचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्ड यांनीही संदीप शर्माच्या दुखापतीबाबत माहिती दिली. संदीप शर्माला काही प्रॉब्लेम असून तो पुढच्या सामन्यापर्यंतही फिट नसल्याचा खुलासा त्याने केला. आम्ही अजूनही काम करत आहोत, असे बाँड म्हणाले.

तो पुढे म्हणाला की, सर्व संघांवर नजर टाकली तर प्रत्येक संघ छोट्या-छोट्या अडचणींशी झुंजत आहे. पण आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला आमच्या बाजूने चांगले खेळाडू मिळाले आहेत. आमच्या गोलंदाजीत भर घालण्यासाठी आम्ही लवकरच संदीप शर्माला NCA मधून परत आणू. आम्ही संदीप शर्मा मिस करत आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT