Rajasthan Royals Share Morphed Video On Twitter Account  esakal
IPL

VIDEO: राजस्थान रॉयल्सने संगकाराचा केला धर्मेंद्र, संजू बनला शाहरूख

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएल मेगा लिलावाची (IPL 2022 Auction) प्रक्रिया नुकतीच पार पडली. 10 संघांनी आपला संघ तगडा करण्याचा जोरदार प्रयत्न केला. आता चाहत्यांना आयपीएलचा हंगाम कधी सुरू होतोय याची उत्सुकता लागली आहे. आयपीएलचा 15 (IPL 15th Season) वा हंगाम हा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. यंदाचा हंगाम हा दोन ते तीन व्हेन्यूवर होणार असल्याने सर्व संघ त्यानुसार आपली रणनीती आखत आहेत.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आयपीएलचा माहोल अजून रंजक बनवण्यासाठी एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. या व्हिडिओत ओम शांती ओम चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याचा आधार घेत मॉफ्ड व्हिडिओ (Morphed Video) तयार करण्यात आला. या व्हिडिओत बॉलीवूडमधील अनेक कलाकारांची एन्ट्री होते. याच कलाकारांच्या चेहऱ्यावर राजस्थान रॉयल्सच्या नव्या खेळाडूंचे फोटो लावून राजस्थानने एक मजेशीर व्हिडिओ तयार केला आहे.

या चित्रपटाचा हिरो शाहरूख खान आहे. त्याच्या चेहऱ्यावर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनचा (Sanju Samson) फोटो लावण्यात आला आहे. तो सर्व खेळाडूंचे स्वागत करताना दिसत आहे. यात युझवेंद्र चहल, जिमी नीशम, शेमरॉन हेटमायर आणि रविचंद्रन अश्विन दिसत आहेत. मात्र या व्हिडिओचे सर्वात मोठे आकर्षण हा संघाचा डारेक्टर कुमार संगकारा (Kumar Sangakkara) ठरली आहे. आरआरने संगकाराचा फोटो बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या चेहऱ्यावर लावला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नीशमने देखील हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरून पोस्ट केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT