Rajasthan Royals | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024 RR vs MI : राजस्थानची घौडदौड कायम! संदीपचा विकेट्सचा पंच अन् जैस्वालची सेंच्युरी मुंबई इंडियन्सवर भारी

IPL 2024 RR vs MI : राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध जयपूरमध्ये विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेनं आगेकुच केली आहे.

Pranali Kodre

RR vs MI, IPL Match: कॅचेस विन मॅचेस असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, याचं महत्त्व मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कळालं असंल... मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी काही सोपे कॅच या सामन्यात सोडले अन् त्यामुळे आधीच वर्चस्व गाजवत असलेल्या राजस्थानला थोपवण्याच्या संधीही गमावल्या.

तसं पाहायला गेलं तर आत्तापर्यंत स्पर्धेत जसं वर्चस्व राजस्थाननं ठेवलंय, तसंच वर्चस्व मुंबईविरुद्धच्या सामन्यातही दिसलं... सुरुवात झाली ती टॉसपासून.

मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली. हार्दिकच्या या निर्णयावर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन खूश झाला. कारण त्याला पहिली बॉलिंगच करायची होती.

राजस्थानसाठी नेहमीप्रमाणे ट्रेंट बोल्टने बॉलिंगची सुरुवात केली आणि रोहित शर्मा पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. दुसरी ओव्हर टाकायला संदीप शर्मा आला. संदीप त्याच्या पहिल्या ओव्हरपासूनच लयीत दिसत होता. त्याने ईशान किशनचा काटा काढला.

इतकंच नाही, तर सूर्यकुमार बॅटिंग आलाय हे पाहाता सॅमसनने चौथ्या ओव्हरमध्येही संदीपकडेच बॉल सोपवला आणि संदीपनंही त्याचं काम चोख बजावलं. राजस्थानच्या मार्गातील सूर्याचा मोठा अडथळा त्यानं दूर केला.

मुंबई अवस्था झालेली ३ बाद २० धावा. अशात युवा क्रिकेटर तिलक वर्मानं मुंबईच्या बॅटिंगची जबाबदारी पेलली. त्यानं नबीबरोबर ३२ धावांची आधी भागीदारी केली. मात्र नबीला युजवेंद्र चहलनं बाद केलं अन् ऐतिहासिक कामगिरी केली. तो आयपीएलमध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला बॉलर ठरला.

नबी बाद झाल्यानंतर मात्र मुंबईची अवस्था बिकट होतीये असं वाटत असतानाच नेहल वढेराने या सामन्यात मिळालेल्या संधीचा फायदा घेतला. त्यानं आणि तिलकनं राजस्थानच्या बॉलर्सला मधल्या ओव्हरमध्ये वरचढ होऊ दिलं नाही. त्यांनी बघता बघता मुंबईला १६ षटकात दिडशे धावा पार करून दिल्या.

मात्र पुन्हा एकदा राजस्थानच्या मदतीला धावला ट्रेंट बोल्ट. त्यानं तिलक आणि वढेराची ९९ धावांची भागीदारी तोडली. वढेरा अर्धशतकासाठी अवघी १ धाव हवी असताना बाद झाला. दरम्यान, नेहमी ४-५ व्या क्रमांकावर फलंदाजीला येणारा हार्दिक या सामन्यात अगदी सातव्या क्रमांकावर बॅटिंगला का आला, याचा काही उलगडा झाला नाही. पण त्यालाही फार काळ आवेश खाननं टिकून दिलं नाही.

आवेशनं आधीच्या तीन ओव्हरमध्ये बऱ्याच धावा खर्च केल्या, पण १९ वी ओव्हर मात्र भारी टाकली आणि हार्दिकची विकेटही घेतली. संदीपनं २० व्या ओव्हरमध्ये कमाल केली. त्यानं आधी अर्धशतक करणाऱ्या तिलकला माघारी धाडलं, पाठोपाठ पहिलाच चेंडू खेळणाऱ्या जेराल्ड कोएत्झीलाही आऊट केलं.

इतकंच नाही, तर त्यानं टीम डेविडलाही याच षटकात बाद करत ५ विकेट्स पूर्ण केल्या. त्यानं या सामन्यात ४ ओव्हरमध्ये फक्त १८ धावा खर्च करत ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या या स्पेलमुळे मुंबईला २०० च्या जवळ जाता आलं नाही. मुंबईला १७९ धावाच राजस्थाननं रोखलं.

आता वेळ १८० धावांचं लक्ष्य गाठण्याचं. फॉर्ममध्ये आलेल्या बटलरबरोबर धावांसाठी झगडणारा यशस्वी जैस्वाल राजस्थानकडून सलामीला उतरला. समोर जसप्रीत बुमराहचं आव्हान होतं. पण या दोघांनी हे आव्हान पेललं. त्यांनी पॉवरप्ले मध्येच फटकेबाजी करत इरादा स्पष्ट केला. पॉवर-प्लेमध्ये १० च्या धावगतीनं त्यांनी धावा जमवल्या.

पण त्यानंतर काही काळ पावसाच्या आगमनाने त्यांच्या खेळाला ब्रेक लागला. या ब्रेकचा फायदा मुंबईने उचलला आणि बटलरला पीयुष चावलानं माघारी धाडलं.

पण बटलर बाद झाला, तरी जैस्वालला लय सापडली होती. तो मुंबईच्या बॉलर्सचा वरचढ ठरायला लागला. त्यानं चौकार-षटकारांची बरसात सुरू केली. दुसऱ्या बाजूने भक्कम साथ द्यायला सॅमसन होताच. त्यातच मुंबईने झेल सोडल्यानं राजस्थानच्या फलंदाजांना जीवदान मिळालेलं. त्याचा त्यांनी योग्य फायदा उतलला.

पाहाता पाहाता जैस्वालनं थेट शतकाला गवसणी घातली. या १७ व्या सिजनच्या पहिल्या सात सामन्यात जैस्वाल अर्धशतकही करू शकला नव्हता, पण या २२ वर्षांच्या खेळाडूने आठव्या सामन्यात फक्त कॅमबॅक केलं नाही, तर खणखणीत शतक ठोकत राजस्थानच्या विजयावरही शिक्कामोर्तब केलं.

त्याच्या शतकावेळी सॅमसननं दिलेली साथही तितकीच मोलाची होती. त्यांच्यात शतकी भागीदारी झाली. या विजयानं राजस्थाननं प्लेऑफच्या उंबरठ्यावर पाऊल ठवलंय आता आणखी एक विजय त्यांचं प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्कं करेल.

मात्र मुंबईची अवस्था बिकट आहे. त्यांना कामगिरीत सातत्य ठेवण्यात अपयश येतंय. आता आव्हान कायम राखायचं असेल, तर त्यांना पुढील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT