Ashok Chandna on IPL 2023  
IPL

RR vs LSG IPL 2023 : राजस्थान लखनौ सामन्यापूर्वी होणार स्टेडियम सील, क्रीडा मंत्र्यांमुळे राजकारण पेटले

Ashok Chandna statement: राजस्थान लखनौ सामन्यापूर्वी राजकीय पटलावर वाद

धनश्री ओतारी

Ashok Chandna statement: आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील दोन अव्वल संघ आज जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

पहिल्या स्थानावरील राजस्थान रॉयल्स व दुसऱ्या स्थानावरील लखनौ सुपर जायंटस्‌ यांच्यामध्ये उद्या लढत होणार आहे. दरम्यान, मैदानातील लढत ही राजकरण्यांमध्ये रंगली आहे. (Rajasthan Sports Minister Ashok Chandna Big Statement Before Match RR vs LSG)

राजस्थानमध्ये होणाऱ्या आयपीएल सामन्यापूर्वी वाद निर्माण झाला आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष वैभव गेहलोत आणि क्रीडा मंत्री अशोक चंदना आमनेसामने आले आहेत. क्रीडा राज्यमंत्री अशोक चंदना यांनी राजस्थान क्रिकेट असोसिएशनवर गंभीर आरोप केले आहेत.

क्रीडा विभागाने राजस्थान क्रिकेट असोसिएशनला नोटीस पाठवली आहे. त्याच्या एक दिवस आधी मंगळवारी सायंकाळी उशिरा राज्याचे क्रीडामंत्री अशोक चंदना स्टेडियम पाहणीसाठी गेले होते.

यावेळी तेथील अनेक त्रुटी पाहून भलतेच संतापले. राजस्थान क्रिकेट असोसिएशनने (आरसीए) क्रीडा परिषदेसोबत केलेल्या सामंजस्य कराराचे उल्लंघन केल्याचे क्रीडामंत्र्यांनी म्हटलं आहे.

स्टेडियममध्ये निश्चित केलेल्या जागेपेक्षा जास्त बांधकाम करण्यात आले आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. अशा परिस्थितीत आम्ही या संपूर्ण प्रकरणावर कठोर कारवाई करू.

गरज पडल्यास सील करण्याची कारवाईही केली जाईल, असेही अशोक चंदना यांनी सांगितले. कारण राजस्थान क्रिकेट असोसिएशनने कोणतेही कारण नसताना एसएमएस स्टेडियमवर कब्जा केल्याचे चंदना यांचे म्हणने आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Vikhe Patil Won Shirdi Assembly Election 2024 final result live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT