IPL 2022: राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) खळबळजनक खुलासा केला होता. त्यात त्याने 2013 मध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळताना जवळपास मृत्यूच्या दाढेत पोहचलो असल्याचे सांगितले. मुंबई इंडियन्समधील एका मद्यधुंद खेळाडूने (Drunk Player) युझवेंद्र चहलला 15 व्या मजल्याच्या बाल्कनीवरून खाली लटकवले होते. त्यावेळी थोडी जरी चूक झाली असती तर युझवेंद्र चहलला आपल्या जीव गमवावा लागला असता. दरम्यान, जेव्हापासून चहलने या प्रकरणाचा उलगडा केला आहे तेव्हापासून भारतीय क्रिकेट वर्तृळातून याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी याबाबत आपले मत (Ravi Shastri Reaction) व्यक्त केले.
युझवेंद्र चहलने राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केलेल्या व्हिडिओत या घटनेबद्दल बोलला होता. त्यावेळी रवीचंद्रन अश्विन आणि करूण नायर देखील उपस्थित होते. यावेली चहल म्हणाला होता की, 'माझी ही गोष्ट काही लोकांना माहिती असेल मात्र मी ही कधी सांगितली नाही. मी मुंबई इंडियन्समध्ये असताना एका मद्यधुंद खेळाडूने मला 15 व्या मजल्याच्या बल्कनीवरून लटकवले होते. त्यावेळी मी माझा हात त्याच्या गळ्याभोवती घट्ट धरून ठेवला होता. मात्र जर एकादी जरी चूक झाली असती तर मी खाली पडलो असतो.' या घटनेनंतर रवी शास्त्री यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी जर एखादा खेळाडू असा करत असेल तर त्याचे डोके ठिकणावर नाहीये.
रवी शास्त्री इएसपीएन क्रिक इन्फोला बोलताना म्हणाले की, 'ही काही चेष्टेची गोष्ट नाही. मला माहिती नाही यात कोणता खेळाडू सहभागी होता. तो शुद्धीत नव्हता. जर असे असेल तर ही फार गंभीर गोष्ट आहे. कोणाच्या जीवाशी खेळ होतोय आणि काही लोकं हे चेष्टेवारी नेत आहे. मझ्यासाठी तरी ही चेष्टेची गोष्ट नाही. जो कोणी अशी चेष्टा करत होता तो शुद्धीत नव्हता. शुद्धीत नसताना तुम्ही अशा गोष्टी करत असाल तर चूक होण्याची दाट शक्यता असते. ही गोष्ट स्विकारणे कठिण आहे.
शास्त्री पुढे म्हणाले की अशा वेळी खेळाडूंनी तक्रार करणे गरजेचे आहे. त्यामुळे यावर त्वरित कारवाई करता येईल. ज्या प्रमाणे तुम्ही भ्रष्टाचार विरोधी समितीकडे फिक्सिंग संदर्भात त्वरित जाऊन तक्रार करता. त्याच प्रमाणे इथे देखील त्वरित अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना या गोष्टी सांगितल्या पाहिजेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.