Ravichandran Ashwin Statement about Virat Kohli RCB Captaincy  esakal
IPL

IPL 2022: कोहली पुन्हा होणार कर्णधार? वरिष्ठ खेळाडूच्या वक्तव्याने चर्चेला ऊत

सकाळ डिजिटल टीम

आयपीएलच्या 15 व्या हंगामात (IPL 2022) सर्वाधिक लक्ष हे भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीकडे (Virat Kohli) असणार आहे. त्याने गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर बेंगलोरच्या (Royal Challenger Benglore) कर्णधार पदाचा (Captaincy) राजीनामा दिला होता. त्यानंतरची ही त्याची पहिलीच आयपीएल असणार आहे. त्याच्या डोक्यावरचा कॅप्टन्सीचा काटेरी मुकूट आता उतरला असल्याने तो फलंदाजीत आपल्या जुन्या लयीत परतण्याची अपेक्षा चाहते करत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ ड्युप्लेसिस (Faf du Plessis) हा विराट कोहलीचा उत्तराधिकारी असणार आहे. दरम्यान, भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) विराट कोहली पुढच्या वर्षी पुन्हा आरसीबीचा कर्णधार होण्याची शक्यता वर्तवली आहे. (Ashwin on Virat Kohli Captainship)

चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अनेक वर्ष महत्वाचा भाग असलेल्या फाफ ड्युप्लेसिसला आरसीबीने यंदाच्या लिलावात 7 कोटी रूपयाला खरेदी केले. याचबरोबर त्यांनी त्याला आपल्या संघाचे कर्णधार देखील केले. मात्र आरसीबीच्या या निर्णयावर काही लोकांनी शंकाही उपस्थित केली. कारण फाफ ड्युप्लेसिस हा 37 वर्षांचा खेळाडू आहे. त्याचा सध्या तरी फिटनेस तगडा असला तरी तो फार काळ आरसीबीसाठी उपयुक्त ठरेल याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आरसीबीसाठी तो दीर्घ काळचा कर्णधार होणे शक्य नाही.

दरम्यान, यंदाचा आयपीएल हंगाम राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळणाऱ्या आर. अश्विनने याबाबत आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, 'त्याला कर्णधार करण्याचा चांगला निर्णय आरसीबीने घेतला. त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे. तसेच त्याच्या नेतृत्वावर धोनीची छाप देखील पहावयास मिळेल.फाफ ड्युप्लेसिसची आयपीएल कारकिर्द ही उतरणीला लागली आहे. तो अजून दोन ते तीन वर्षे खेळू शकतो. '

अश्विन पुढे म्हणाला की, 'मला असे जाणवते की विराट कोहलीवर गेल्या काही वर्षापासून कॅप्टन्सीचा चांगलाच ताण होता. या वर्षी तो कॅप्टन्सीमधून ब्रेक घेईल. माझा असा अंदाज आहे की आरसीबी त्याला पुढच्या वर्षी पुन्हा कर्णधार करेल.' विराट हा आरसीबीचा 2013 पासून कर्णधार आहे हे अश्विनने अधोरेखित केले. विराट कोहलीने आरसीबीचा कर्णधार असताना फलंदाज म्हणून खोऱ्याने धावा केल्या. मात्र त्याला आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देता आलेले नाही. आता आरसीबी या हंगामात कशी कामगिरी करते हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: अजितदादांचा आनंद द्विगणित! पुण्यातील आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? 'या' तीन नावांची चर्चा

IND vs AUS : Yashasvi Jaiswal च्या दीडशतकी खेळीने रचला नवा विक्रम ; दिग्गजांमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय

Adampur Firing : भरदिवसा दोन टोळ्यांमध्ये गोळीबारचा थरार; एकमेकांवर झाडल्या गोळ्या, आदमापुरात नेमकं काय घडलं?

Girish Mahajan : गिरीश महाजन ठरले पुन्हा संकट मोचक; बंडखोरी थोपविण्यात यश

Nashik East Assembly Constituency : बालेकिल्ला शाबूत, ढिकलेच ‘पहिलवान’

SCROLL FOR NEXT