Ravindra Jadeja | MS Dhoni | CSK | IPL Sakal
IPL

Ravindra Jadeja: 'मी घोळक्यात जात होतो अन् थालाने...', जडेजाने सांगितली IPL जिंकल्यानंतरच्या खास क्षणाची आठवण

MS Dhoni: आयपीएल 2023 स्पर्धा जिंकल्यानंतर धोनीने उचलून घेतले, त्याक्षणी काय झालेलं? याची आठवण जडेजाने सांगितली आहे.

सकाळ डिजिटल टीम

MS Dhoni lift for Ravindra Jadeja: 'इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे अवघे 4 दिवस या स्पर्धेला बाकी असतानाच सर्व संघांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात चेन्नईमध्ये होणार आहे.

दरम्यान, या सामन्यापूर्वी चेन्नईचा अष्टपैलू रविंद्र जडेजाने गेल्यावर्षीच्या आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील खास आठवण शेअर केली आहे. अंतिम सामन्यानंतर धोनीने त्याला उचलले, तेव्हा काय झाले होते, याचा खुलासा केला आहे.

आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला होता. पावसामुळे राखीव दिवशी हा सामना झाला होता. तसेच गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 214 धावा केल्या नंतर पावसाच्या व्यत्ययामुळे चेन्नईसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 171 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावांची गरज होती. यावेळी जडेजा स्ट्राईकवर होता. त्यावेळी त्याने षटकार आणि मग चौकार ठोकला आणि चेन्नईला पाचवे विजेतेपद मिळवून दिले होते. यानंतर चेन्नईच्या सेलिब्रेशनवेळी कर्णधार धोनीने त्याला उचलून आनंद व्यक्त केला होता. या क्षणाचा व्हिडिओ आणि फोटो खूप व्हायरल झाले होते.

दरम्यान , जडेजाने चेन्नईचा हा विजयही धोनीला समर्पित केला होता. आता याच क्षणाच्या मोठ्या फोटोफ्रेमजवळ बसून त्यामागील आठवण जडेजाने सांगितली आहे. याचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये जडेजा म्हणाला, 'जिंकल्यानंतर संपूर्ण घोळक्यात मी जात होतो. तेव्हा त्याने मला धरलं आणि उचललं. हो नक्कीच ही माझी आवडती आठवण आहे, जी मी कधीच विसरणार नाही. थालाकडून मिळालेली ही मिठी माझ्या हृदयात. खूप प्रेम थाला.'

दरम्यान, जडेजानेही या फ्रेमसमोर बसलेला फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे की 'सुपर स्पेशल मुमेंट.'

दरम्यान आता आयपीएल 2024 हंगाम धोनीचा अखेरचा हंगाम असेल, अशी सध्या तरी चर्चा आहे.

जडेजाच्या आयपीएलमधील कामगिरीबद्दल सांगायचे झाले, तर 226 सामन्यांत 2692 धावा केल्या आहेत आणि 152 विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये 2500 पेक्षा अधिक धावा आणि 150 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा सध्यातरी एकमेव खेळाडू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT