Ravindra Jadeja | CSK | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024: जड्डूनं 'तो' विजयी चौकार पुन्हा ठोकला अन् चेन्नईकरांच्या गेल्या वर्षीच्या आठवणी ताज्या झाल्या

Ravindra Jadeja: चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 चे विजेतेपद अहमदाबादमध्ये जिंकले होते. आता या विजेतेपदानंतर जवळपास एक वर्षाने चेन्नई पुन्हा अहमदाबादमध्ये सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. या सामन्यापूर्वी जडेजाने चेन्नईच्या विजेतेपदाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Pranali Kodre

Chennai Super KIngs: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 59 वा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.

हे स्टेडियम चेन्नई सुपर किंग्ससाठी खास आहे. कारण चेन्नईने गेल्याच वर्षी या स्टेडियमवर खेळताना एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे पाचव्यांदा विजेतेपद पटकावले होते. चेन्नईला हे विजेतेपद जिंकून देण्यात अष्टपैलू रविंद्र जडेजाचे मोलाचे योगदान राहिले होते.

आता हे विजेतेपद पटकावल्यानंतर जवळपास एक वर्षाने चेन्नई सुपर किंग्स या स्टेडियमवर पुन्हा एकदा सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. दरम्यान, हा सामना खेळण्यापूर्वी जडेजाने गेल्यावर्षीच्या अंतिम सामन्यातील विजयी क्षणाची आठवण पुन्हा चाहत्यांना करून दिली आहे.

झाले असे की 2023 आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघ अहमदाबादमध्ये आमने-सामने होते. त्यावेळी पावसामुळे अंतिम सामना राखीव दिवशी खेळवण्यात आला होता. राखीव दिवशीही पावसाचा व्यत्यय आलेला.

दरम्यान अंतिम सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 214 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे चेन्नईसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 171 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.

या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला शेवटच्या दोन चेंडूत 10 धावांची गरज होती. यावेळी जडेजाने षटकार आणि मग शॉर्ट फाईन लेगला चौकार ठोकला होता. यासह चेन्नईने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले होते.

विजयी चौकार ठोकल्यानंतर जडेजाने संपूर्ण स्टेडिमवर आनंदाने पळाला होता आणि नंतर त्याने धोनीला मिठी मारली होती. धोनीनेही त्याला आनंदाने उचलून घेतले होते.

दरम्यान, आता जडेजाने पुन्हा एकदा अहमदाबादमध्ये आल्यानंतर त्या विजयी चौकाराची नक्कल करून दाखवत पुन्हा एकदा आठवणी ताज्या केल्या आहेत. याचा व्हिडिओही चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, आता आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्स सध्या पाँइंट्स टेबलमध्येच चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 11 सामन्यांपैकी 6 विजय मिळवले आहेत, तर 5 पराभव स्विकारले आहेत. त्यामुळे त्यांचे 12 पाँइंट्स आहेत.

चेन्नई यंदाही प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. मात्र गुजरात टायटन्स यंदा संघर्ष करताना दिसत आहेत. गुजरातने 11 सामन्यांपैकी 4 सामन्यातच विजय मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परप्रांतीयांच्या मतांचा गठ्ठा कुणाच्या पारड्यात? मतदारांना गोंजारण्यासाठी घेतल्या बैठका, कोण ठरणार वरचढ?

Accident : भरधाव इको कारची ट्रकला धडक, 6 जणांचा जागीच मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

Latest Marathi News Updates : वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्याआधी भारतीय संघातील सराव सामना का महत्त्वाचा? कोचनेच केला खुलासा

आधी मनसे आता भाजप? महायुतीला मत द्या म्हटल्याने सायली संजीव ट्रोल; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला सुनावलं

SCROLL FOR NEXT