Swapnil Singh | RCB | IPL Sakal
IPL

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pranali Kodre

Swapnil Singh: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने इंडियन प्रीमीयर लीग 2024 मध्ये शानदार पुनरागमन करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. बंगळुरूला या हंगामात पहिल्या 8 सामन्यांत तब्बल 7 पराभव स्विकारावे लागले होते. मात्र नंतर त्यांनी सलग 6 सामने जिंकत प्लेऑफमधील चौथे स्थान मिळवले.

दरम्यान, बंगळुरूच्या या पुनरागमनात अनेक क्रिकेटपटूंचा मोलाचा वाटा राहिला, ज्यात स्वप्नील सिंगचाही समावेश आहे. स्वप्नीलला सुरुवातीच्या 8 सामन्यात बंगळुरूने संधी दिली नव्हती. पण नवव्या सामन्यापासून तो बंगळुरूकडून खेळला, विशेषत:तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून योगदान देताना दिसला. त्याने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीही योगदान दिले.

स्वप्नीलचे नाव देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेहमीच चर्चेत असते. त्याला 2008 मध्येच मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये निवडलेही होते. परंतु, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

त्यानंतर त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी 2016 सालाची वाट पाहावी लागली. त्याने पंजाब किंग्सकडून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पदार्पण केले. पण त्यात त्याला खास काही करता आले नाही.

त्यानंतर त्याला संधी मिळाली ती लखनौ सुपर जायंट्सकडून 2023 मध्ये त्यावेळी अँडी फ्लॉवर प्रशिक्षक होते. पण 2024 मध्ये फ्लॉवर यांनी बंगळुरूचे प्रशिक्षकपद स्विकारले. यावेळी स्वप्नीलने त्यांना प्री-सिजन ट्रायल कँम्पमध्ये एक शेवटची संधी देण्याची विनंती केली होती. अखेर स्वप्निलला बंगळुरूने लिलावात शेवटी 20 लाखांच्या मुळ किंमतीत संघात घेतले.

त्याच्या या संपूर्ण प्रवासाबाबात स्वप्निलने भाष्य केले आहे. याचा व्हिडिओही बंगळुरूने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्वप्नीलने विराटबरोबर वयोगटातील क्रिकेटही खेळल्याची आठवण सांगितली. त्याने सांगितले की विराटबरोबर त्याने रुमही शेअर केली होती.

दरम्यान, त्याने सांगितले की जर त्याला या हंगामात संधी मिळाली नसती, तर त्याने क्रिकेट सोडण्याचा विचार केला होता. तो त्याच्या प्रवासाबद्दल सांगत असताना भावूकही झाला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रुही वाहिले.

तो म्हणाला, 'लिलावाच्या दिवशी मी रणजी सामन्यासाठी डेहराडूनवरून प्रवास करत होतो. आम्ही रात्री 7-8 वाजताच्या दरम्यान पोहोचलो.त्यावेळी लिलावाचा शेवटचा राउंड सुरू होता. तोपर्यंत काहीही झालं नव्हतं. खरं सांगायचं तर मी विचार केलेला की आता थांबावं.'

'मी चालू रणजी हंगाम खेळेल आणि गरज पडल्यास आणखी एक खेळेल आणि थांबेल. कारण मला आयुष्यभर खेळायचे नाहीये. जग जिंकण्यासाठी आणखीही अनेक गोष्टी आहेत. मी खूप निराश होतो. पण मी जेव्हा माझ्या कुटुंबाला फोन केला, तेव्हा सर्वच भावूक झाले. अनेकांना हा किती भावनिक प्रवास होता, हे माहित नाही.'

यादरम्यान, स्वप्निलने असेही सांगितले की बडोदा संघाकडून काहीवर्षे खेळल्यानंतर त्याला आता संघात जागा नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर त्याने बडोदा संघ सोडला आणि तो उत्तराखंडकडून खेळायला लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT