Virat Kohli | RCB | IPL 2024 X/IPL
IPL

Virat Kohli in IPL: विराट सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत टॉप-5 मध्ये; धोनी-गेललाही टाकलं मागे

Most Sixes in IPL: विराट कोहलीने आता आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत टॉप-5 मध्ये आला असून त्याने धोनीलाही मागे टाकले आहे.

Pranali Kodre

Virat Kohli in IPL: इंडियन प्रीमीयर लीग 2024 (IPL 2024) स्पर्धेत 10 वा सामना शुक्रवारी (29 मार्च) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. या सामन्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला.

असे असले तरी बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने या सामन्यात नाबाद अर्धशतक करत वैयक्तिक दोन मोठे विक्रम केले आहेत.

या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या बेंगळुरूकडून विराट सलामीला फलंदाजीला उतरला होता. त्याने 59 चेंडूत नाबाद 83 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले.

त्यामुळे आता विराटने आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत एमएस धोनीला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर आला आहे. विराटच्या नावावर आता 240 आयपीएल सामन्यात 241 षटकार झाले आहेत. धोनीने 252 आयपीएल सामन्यांत 239 षटकार मारले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर ख्रिस गेल आहे. त्याने 142 सामन्यांत 357 षटकार मारले आहेत. तो एकमेव खेळाडू आहे, ज्याने आयपीएलमध्ये 300 हून अधिक षटकेर मारले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू (आकडेवारी 29 मार्च 2024 पर्यंत)

  • 357 षटकार - ख्रिस गेल (142 सामने)

  • 261 षटकार - रोहित शर्मा (245 सामने)

  • 251 षटकार - एबी डिविलियर्स (184 सामने)

  • 241 षटकार - विराट कोहली (240 सामने)

  • 239 षटकार - एमएस धोनी (252 सामने)

विराटने गेलला टाकले मागे

दरम्यान, विराट हा पहिल्या हंगामापासून बेंगळुरूसाठी खेळत आहे. त्यामुळे त्याने आयपीएलमध्ये मारलेले सर्व 241षटकार हे बेंगळुरू संघाकडून खेळताना मारले आहेत.

त्याचमुळे तो आता बेंगळुरूकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडूही ठरला आहे. त्याने ख्रिस गेलला या यादीत मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. गेलने आयपीएलमध्ये बेंगळुरूकडून 85 सामने खेळताना 239 षटकार मारले आहेत.

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू

  • 241 षटकार - विराट कोहली (240 सामने)

  • 239 षटकार - ख्रिस गेल (85 सामने)

  • 238 षटकार - एबी डिविलियर्स (156 सामने)

  • 68 षटकार - ग्लेन मॅक्सवेल (45 सामने)

  • 50 षटकार - फाफ डू प्लेसिस (33 सामने)

बेंगळुरूचा पराभव

दरम्यान, विराटने केलेल्या 83 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर बेंगळुरूने शुक्रवारी झालेल्या सामन्यात 20 षटकात 6 बाद 182 धावा केल्या होत्या. त्यानंतर 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कोलकाताने 16.5 षटकातच 3 विकेट्स गमावत 186 धावा करत पूर्ण केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

Deolali Assembly Constituency : देवळालीच्या वाढीव टक्क्याचा लाभार्थीचा फैसला शनिवारी

SCROLL FOR NEXT