Virat Kohli IPL 2024 News sakal
IPL

IPL 2024 : विराट कोहली रचणार इतिहास! दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मैदानात एन्ट्री मारताच करणार 'हा' मोठा विक्रम

Kiran Mahanavar

Virat Kohli 250 Match for RCB News : आयपीएल 2024 मधील आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठी खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यात मैदानात एन्ट्री मारताच विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करेल, जो आजपर्यंत आयपीएलमध्ये कोणालाही करता आलेला नाही. त्याचवेळी प्लेऑफच्या दृष्टिकोनातून आजचा सामना जिंकणे आरसीबीसाठी महत्त्वाचे आहे.

विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून आरसीबीकडून खेळत आहे. आरसीबी व्यतिरिक्त विराट कोहली आयपीएलमध्ये इतर कोणत्याही संघाकडून खेळलेला नाही. त्याने अनेक वर्षे संघाचे कर्णधारपदही भूषवले आणि संघासाठी भरपूर धावा केल्या. विराट कोहलीने आतापर्यंत 249 सामन्यांत 38 च्या सरासरीने 7897 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने आरसीबीसाठी 8 शतके झळकावली आहेत.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना हा विराट कोहलीचा आयपीएलमधील आरसीबीचा 250 वा सामना असेल. यासह कोहली आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही एका फ्रँचायझीसाठी 250 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरणार आहे. हा विक्रम याआधी इतर कोणत्याही खेळाडूच्या नावावर नव्हता. पण विराट कोहलीच्या नावावर तो रेकॉर्ड होणार आहे. या कारणास्तव हा सामना विराट कोहलीसाठी खूप महत्त्वाचा आहे.

दुसरीकडे, आरसीबीला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. आरसीबीचा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध करो या मरो हा सामना होणार आहे. जर आरसीबी हा सामना हरला तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होईल आणि जर संघ जिंकला तर ते स्पर्धेत कायम राहतील.

याशिवाय आरसीबी प्रार्थना करेल की सीएसके राजस्थानविरुद्धचा सामना हरला पाहिजे. आयपीएल प्लेऑफच्या आधी आज आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एक प्रकारचा एलिमिनेटर खेळला जाणार आहे. हा सामना कोणताही संघ हरेल, त्यांची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता फारच कमी असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT