IPL 2023 Points Table 
IPL

IPL 2023 : RCB प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम! लाजिरवाण्या पराभवानंतरही संजूची राजस्थान होऊ शकते पात्र?

आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा 112 धावांनी पराभव करत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या तर...

Kiran Mahanavar

IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 चे 61 सामने खेळल्या गेले आहेत आणि लीग टप्प्यात 9 सामने खेळायचे आहेत. 60 व्या सामन्यात राजस्थान संघ आरसीबीविरुद्ध वाईट रीतीने पराभूत होऊन प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. पण तरीही आकडेवारी अशी आहे की राजस्थान अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे.

त्याच वेळी या विजयानंतर आरसीबीने प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही स्वतःला पूर्णपणे अबाधित ठेवले आहे. या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सच्या उरलेल्या आशा काय आहेत, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

पॉइंट टेबलवर नजर टाकल्यास गुजरात टायटन्स संघ 12 पैकी 8 सामने जिंकून 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जने 13 पैकी 7 सामने जिंकले आहेत आणि त्यांच्यापैकी एक सामना पावसाचा होता. धोनीचा संघ 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर 12 पैकी 7 सामने जिंकणारा मुंबई इंडियन्स तिसर्‍या आणि लखनौ सुपर जायंट्स 12 सामन्यांत 13 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

जर आपण समीकरणांबद्दल बोललो तर दिल्ली कॅपिटल्स आता अंतिम-4 च्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. त्याचवेळी केकेआरकडे शेवटची संधी आहे. सनरायझर्स हैदराबादनेही त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर त्यांना केवळ 14 गुणांपर्यंतच मजल मारता येईल. पुढचा सामना जिंकल्यास केकेआरची अवस्थाही अशीच आहे.

राजस्थान अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कसे?

राजस्थानला आपला शेवटचा साखळी सामना पंजाब किंग्जविरुद्ध खेळायचा आहे. शनिवारी दिल्लीला हरवून पंजाबने आपल्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पंजाबला पुढचा सामना सुद्धा दिल्ली विरुद्ध खेळायचा आहे. पंजाबने दिल्लीकडून तो सामना जिंकला तर राजस्थानला पंजाबला कोणत्याही किंमतीत हरवावे लागेल. म्हणजेच प्लेऑफबाबत पंजाब आणि राजस्थान यांच्यात सामना होऊ शकतो. दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्स यामध्ये सर्वात मोठा पेच टाकत आहेत.

CSK विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सचा सामना पावसामुळे वाहून गेला. या सामन्यात दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. सीएसकेला तो सामना सहज जिंकता आला असता. पण लखनौचा संघ 12 सामन्यांत 6 विजयांसह 13 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. लखनौला आपले उर्वरित दोन सामने मुंबई आणि केकेआरकडून खेळायचे आहेत.

जर त्यांनी एकही सामना जिंकला तर राजस्थानचा संघ शेवटचा सामना जिंकूनही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. म्हणजे राजस्थानच्या आशा अजूनही लखनौवर अवलंबून आहेत. जर लखनौने शेवटचे दोन्ही सामने गमावले तर राजस्थानसाठी फक्त आशा निर्माण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT