RCB vs kkr reece toply out from the second league match against kkr ipl 2023  
IPL

IPL 2023 : मुंबईला लोळवणाऱ्या RCB ला मोठा झटका; खुंखार गोलंदाज अचानक संघाबाहेर

रोहित कणसे

RCB vs KKR : रविवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात IPL 2023 चा पाचवा सामना खेळला गेला. या सामन्यात विराट आणि प्लेसीच्या खेळीमुळे बंगळुरूने मुंबईचा सहज पराभव केला. मात्र, आता कोलकाताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा एक गोलंदाज दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यात सहभागी होणार नाहीये.

मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सचा वेगवान गोलंदाज रीस टॉपली दुखापतीमुळे संपूर्ण सामन्यातून बाहेर पडला होता. क्षेत्ररक्षण करताना टॉपली जखमी झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खांद्याला झालेल्या दुखापतीनंतर तो मैदानाबाहेर पडला, त्याचा खांदा डिसलोकेट झाला आहे. पण आता तो कोलकाताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश नसणार आहे.

हेही वाचा - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

संघाचे प्रशिक्षक माइक हेसन यांनी रविवारी संघाच्या विजयानंतर आरसीबीच्या यूट्यूब चॅनलला सांगितले की, दुर्दैवाने त्याचा गुडघा जमिनीत अडकला. तो त्याच्या खांद्यावर पडला, ज्यामुळे त्याचा खांदा निखळला. मात्र, टीम डॉक्टरांनी त्याचवेळी उपचार करून खांदा जागेवर आणला. ते पुढे म्हणाला की तो सध्या स्कॅनसाठी गेला आहे. आम्हाला आशा आहे की रिपोर्ट चिंताजनक नसतील आणि तो आमच्यासोबत राहील.

संघाच टेन्शन वाढलं..

जर टॉपली जास्त कालावधीसाठी संघाबाहेर राहीला तर तो रजत पाटीदार आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड यांसारख्या जखमी खेळाडूंच्या यादीत सामील होईल. पाटीदार टाचेच्या दुखापतीने त्रस्त आहे आणि किमान आयपीएलच्या पहिल्या हाफमध्ये तो मैदानाबाहेर असेल. हेझलवूड पहिल्या सात सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत टॉपलीची दुखापत हा संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

SCROLL FOR NEXT