IPL

IPL 2023 : स्टॉयनिस, पूरन भाऊने 22 चेंडूत ठोकल्या 112 धावा! ...अन् आरसीबीच्या पोरी रडल्या

Kiran Mahanavar

RCB vs LSG IPL 2023 : लखनौ सुपर जायंटस् संघाने सोमवारी आयपीएलमधील लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर सनसनाटी विजयाची नोंद केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून मिळालेल्या 213 धावांचा पाठलाग करणाऱ्या लखनौ सुपर जायंटस् संघाने 20व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर एक विकेट राखून रोमहर्षक विजय मिळवला.

मार्कस स्टॉयनिस (65 धावा), निकोलस पुरन (62 धावा), आयुष बदोनी (30 धावा) यांनी दबावाखाली शानदार फलंदाजी करीत लखनौ सुपर जायंटसच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. लखनौ सुपर जायंटस्ने तिसऱ्या विजयासह गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर झेप घेतली.(Nicholas Pooran Marcus Stoinis)

बंगळूरकडून लखनौसमोर 213 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. पण मोहम्मद सिराज व वेन पार्नेलच्या भेदक गोलंदाजीमुळे लखनौची अवस्था 3 बाद 23 धावा अशी झाली. यानंतर मार्कस स्टॉयनीस याने कर्णधार के. एल. राहुलसोबत लखनौसाठी मोलाची कामगिरी बजावली. स्टॉयनीसने ३० चेंडूंमध्ये ६ चौकार व ५ षटकारांच्या सहाय्याने ६५ धावांची खेळी केली. सिराजच्या गोलंदाजीवर राहुलही18 धावांवर बाद झाला.

निकोलस पुरन व आयुष बदोनी या जोडीने लखनौच्या विजयाची आशा कायम ठेवली. पुरनने अवघ्या 19 चेंडूंमध्ये 4 दमदार चौकार व 7 खणखणीत षटकारांसह 62 धावांची फटकेबाजी केली. पुरन सामना जिंकून देणार असे वाटत असतानाच सिराजच्या गोलंदाजीवर तो शाहबाजकरवी झेलबाद झाला.

मार्कस स्टॉयनीस आणि निकोलस पुरन 10 चौकार 12 षटकार मारले, याचा अर्थ त्यांनी फक्त चौकार षटकार मारून 22 चेंडूत ठोकल्या 112 धावा केल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. बंगळूरच्या पराभव नंतर स्टेडियम मधील चाहत्यांचे फोटो व्हायरल झाले. ज्यामध्ये पोरी रडताना दिसत आहे

दरम्यान, फाफ ड्युप्लेसी व विराट कोहली या सलामी जोडीने मुंबईविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती या लढतीत केली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 69 धावांची आक्रमक भागीदारी। रचली. यामध्ये विराटचा वाटा होता 61 धावांचा. त्याने 44 चेंडूंमध्ये 4 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी करताना नेत्रदीपक फलंदाजी केली. विराट बाद झाल्यानंतर ड्युप्लेसी व ग्लेन मॅक्सवेल या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी रचली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT