Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings IPL 2024 Score : आयपीएल 2024 चा सहावा सामना आज रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज आरसीबीच्या होम ग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने 20 षटकांत 176 धावा केल्या
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 19.2 षटकात 177 धावांचे लक्ष्य पार करत पंजाब किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यात विराट कोहली संघाचा हिरो ठरला होता.
विराट कोहलीने 49 चेंडूत 77 धावांची खेळी केली. त्याचवेळी दिनेश कार्तिकने 10 चेंडूत 28 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकशिवाय महिपाल लोमरोरनेही 8 चेंडूत नाबाद 17 धावा केल्या.
विराट कोहलीच्या रूपाने आरसीबीला पाचवा मोठा धक्का बसला. 16 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हर्षल पटेलने झेलबाद केले. या शानदार खेळीत त्याने 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. त्यानंतर 17व्या षटकात अनुज रावतच्या रूपाने मोठा धक्का बसला. आता संघाला विजयासाठी १२ चेंडूत २३ धावांची गरज आहे.
विराट कोहलीने या मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले आहे. कोहलीने अवघ्या 31 चेंडूत हा पराक्रम केला.
आरसीबीला पहिला झटका कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या रूपाने बसला जो 26 धावांवर बाद झाला. त्याला केवळ तीन धावा करता आल्या. कॅमेरून ग्रीन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.
पंजाबने आरसीबीविरुद्ध 20 षटकांत 176 धावा केल्या आणि संघासमोर 177 धावांचे लक्ष्य ठेवले. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शशांक सिंगने शेवटच्या ओव्हरमध्ये षटकार-चौकारचा पाऊस पाडला आणि 20 धावा लुटल्या.
12व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 17 धावा काढून लियाम लिव्हिंगस्टोन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी शिखर धवन 13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. धवन पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 45 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 14 षटकांनंतर संघाची धावसंख्या 111/4 आहे.
नवव्या षटकातील पाचव्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलने पंजाब किंग्जला 72 धावांवर दुसरा धक्का दिला आहे. प्रभासिमरनला दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 25 धावा करता आल्या. धवन आणि प्रभासिमरन यांच्यात 55 धावांची भागीदारी झाली.
पंजाब किंग्जला 17 धावांच्या स्कोअरवर पहिला धक्का बसला आहे. जॉनी बेअरस्टोला केवळ आठ धावा करता आल्या. तिसऱ्या षटकात मोहम्मद सिराजने त्यांची विकेट घेतली. प्रभसिमरन सिंग तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. तीन षटकांनंतर संघाची धावसंख्या 21/1 आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्स प्रथम गोलंदाजी करणार आहे. दोन्ही संघात कोणताही बदल झालेला नाही.
आयपीएल 2024 मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात सामना खेळला जाईल. हा सामना बेंगळुरू येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.