RCB vs SRH, IPL Record: इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये सोमवारी (15 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदाराबाद संघात सामना झाला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने 25 धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 287 धावा केल्या होत्या, तर 288 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूने 20 षटकात 7 बाद 262 धावा केल्या.
त्यामुळे या सामन्यात 40 षटकात तब्बल 549 धावांचा पाऊस पडला. इतकेच नाही तर या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी मिळून 19 चौकार आणि 22 षटकार मारले, तर बेंगळुरूच्या फलंदाजांनी मिळून 24 चौकार आणि 16 षटकार मारले, असे मिळून या सामन्यात तब्बल 81 चेंडू सीमापार गेले.
यामुळे टी20 क्रिकेटमध्ये मात्र नवे इतिहास रचले गेले. एका टी20 सामन्यात सर्वाधिक धावा होण्याचा नवा विश्वविक्रम या सामन्याने रचला. यापूर्वी हा विक्रम सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2024 मध्येच हैदराबादला झालेल्या सामन्याच्या नावावर होता. त्या सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून 523 धावा झाल्या होत्या.
याशिवाय एका टी20 सामन्यात सर्वाधिक बाऊंड्री मारण्याच्या विश्वविक्रमाचीही बरोबरी हैदराबाद-बेंगळुरू सामन्याने केली आहे. 2023 मध्ये वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघात सेंच्युरियनला झालेल्या टी20 सामन्यातही 81 बाऊंड्री मारण्यात आल्या होत्या.
549 धावा - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु; बेंगळुरू, 2024
523 धावा - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स; हैदराबाद, 2024
517 धावा - वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका; सेंच्युरियन, 2023
515 धावा - मुलतान सुलतान विरुद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्स; रावळपिंडी, 2023
506 धावा - सरे विरुद्ध मिडलसेक्स; द ओव्हल, 2023
81 बाऊंड्री - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु; बेंगळुरू, 2024
81 बाऊंड्री - वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, 2023
78 बाऊंड्री - मुलतान सुलतान विरुद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्स, रावळपिंडी, 2023
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.