RCB vs SRH | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024, RCB vs SRH : हैदराबादने चिन्नास्वामीचं मैदान मारलं! अडीचशे धावा करूनही बेंगळुरू विजयापासून दूरच

Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad : आयपीएलमध्ये सोमवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे.

Pranali Kodre

Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad :

आयपीएलमध्ये सोमवारी (१५ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या घरच्या मैदानावर एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात हैदराबादने २५ धावांनी विजय मिळवला.

हैदराबादचा हा ६ सामन्यांमधील चौथा विजय ठरला. त्यामुळे त्यांनी पाँइंट्स टेबलमध्ये चौथा क्रमांक मिळवला आहे. मात्र बेंगळुरूचा हा ७ सामन्यांमधील ६ वा पराभव आहे. त्यामुळे ते पाँइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहेत.

या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद २८७ धावा केल्या. यासह बेंगळुरूसमोर २८८ धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूने २० षटकात ७ बाद २६२ धावा केल्या. त्यामुळे बेंगळुरूला पराभवाचा धक्का बसला.

IPL 2024, RCB vs SRH Live Score : हैदराबादने जिंकलं चिन्नास्वामीचं मैदान! अडीचशे धावा करूनही बेंगळुरू विजयापासून दूरच

या सामन्यात २८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूने २० षटकात ७ बाद २६२ धावा केल्या. त्यामुळे बेंगळुरूला २५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. २० व्या षटकानंतर अनुज रावत १४ चेंडूत २५ धावांवर नाबाद राहिला, तर विजयकुमार वैशाख १ धावेवर नाबाद राहिला.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : टी नटराजनने थांबवलं कार्तिकचं वादळ; बेंगळुरूच्या 240 धावा पार

आक्रमक खेळणाऱ्या दिनेश कार्तिकला १९ व्या षटकात टी नटराजनने बाद केले. त्याने ऑफ साईडच्या बाहेर टाकलेल्या चेंडूवर कार्तिकने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेत यष्टीरक्षक क्लासेनच्या हातात गेला. त्यामुळे कार्तिकला ३५ चेंडूत ८३ धावा करून बाद व्हावे लागले. कार्तिकने या खेळीत ५ चौकार आणि ७ षटकार मारले.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : कार्तिक लढला! तीन विकेट्स घेणाऱ्या कमिन्सविरुद्ध सिक्स ठोकत 23 चेंडूत ठोकली फिफ्टी

एका बाजूने विकेट्स जात असताना दिनेश कार्तिकने मात्र झुंझार अर्धशतक ठोकले. त्याने तीन विकेट्स घेणाऱ्या पॅट कमिन्सविरुद्धही आक्रमक पवित्रा स्विकारला. त्याने कमिन्सने गोलंदाजी केलेल्या १७ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. त्याने २३ चेंडूत अर्धशतक केले. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवरही त्याने षटकार ठोकला.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : कमिन्सने घेतली तिसरी विकेट, आक्रमक खेळणाऱ्या लोमरोरला केलं आऊट; बेंगळुरूची भिस्त कार्तिकवर

१० व्या षटकात दोन विकेट्स गमावल्यानंतर बेंगळुरूचा डाव दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोरने सावरला होता. या दोघांनी आक्रमक खेळ कायम केला होता. मात्र, त्यांची भागीदारी रंगत असतानाच पुन्हा एकदा कमिन्सने आपला दर्जा दाखवला आणि लोमरोरला १५ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत केले.

लोमरोर ११ चेंडूत १९ धावा करून बाद झाला. १५ षटकात बेंगळुरूने ६ बाद १८७ धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिक ३६ धावांवर नाबाद असून त्याला साथ देण्यासाठी अनुज रावत आला आहे.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : बेंगळुरूचा अर्धा संघ तंबुत! कमिन्सने एकाच षटकात दिले दुहेरी धक्के

कमिन्सने १० व्या षटकात डू प्लेसिस पाठोपाठ शेवटच्या चेंडूवर सौरव चौहानलाही पायचीत केले. सौरव भोपळाही फोडू शकला नाही. त्यामुळे महिपाल लोमरोर ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. १० षटकात बेंगळुरूने ५ बाद १२२ धावा केल्या.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : बेंगळुरूला चौथा धक्का! कमिन्स केला आक्रमक खेळणाऱ्या डू प्लेसिसचा अडथळा दूर

दमदार सुरुवातीनंतर बेंगळुरूला लागोपाठ मोठे धक्के बसले. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने आक्रमक अर्धशतक करणारा बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला बाद केले. त्याचा झेल यष्टीरक्षक हेन्रिक क्लासेनने घेतला. डू प्लेसिस १० व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर २८ चेंडूत ६२ धावा करून बाद झाला.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : बेंगळुरूला तिसरा धक्का; विल जॅक्सपाठोपाठ पाटीदारही आऊट

जॅक्सनंतर ९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मयंक मार्कंडेने रजत पाटीदारला ९ धावांवर बाद केले. मार्कंडेने टाकलेल्या गुगलीवर पाटीदार शॉट खेळताना चूकला आणि नितीश रेड्डीकडे झेल देत बाद झाला.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : विल जॅक्स धावबाद

फाफ डू प्लेसिसने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर विल जॅक्स धावबाद झाला. जयदेव उनाडकटने टाकलेल्या धीम्या गतीच्या चेंडूवर डू प्लेसिसने सरळ शॉट मारला. पण यावेळी उनाडकटचा चेंडू आवडताना चेंडूला स्पर्श झाला. हा चेंडू नॉन-स्ट्रायकर एन्डच्या स्टंपला लागला, त्यावेळी जॅक्स क्रिजच्य बाहेर होता. त्यामुळे त्याला धावबाद व्हावे लागले. तो ७ धावांवर माघारी परतला.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : विराट क्लिन-बोल्ड, पण डू प्लेसिसने झळकावलं वेगवान अर्धशतक

विराट बाद झाल्यानंतरही फाफ डू प्लेसिसने आपला खेळ कायम ठेवताना २३ चेंडूत अर्धशतक झळकावलं. हे त्याचे वैयक्तित दुसरे वेगवान आयपीएल अर्धशतक ठरले.

मार्कंडेने केलं विराटला क्लिन-बोल्ड

आक्रमक खेळणाऱ्या विराटला मयंक मार्कंडेने ७ व्या षटकात त्रिफळाचीत केले. मार्कंडेने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर शॉट खेळण्यास विराट चूकला आणि चेंडू थेट स्टंपवर आदळला. त्यामुळे विराटला २० चेंडूत ४२ धावांवर बाद व्हावे लागले. या खेळीत विराटने ६ चौकार आणि २ षटकार मारले.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : विराट-डू प्लेसिसची बेंगळुरूसाठी आक्रमक सुरूवात; 288 धावांचा पाठलाग करताना 4 ओव्हरमध्ये 50 धावा पार

हैदराबादने दिलेल्या २८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूकडून सलामीला उतरलेल्या विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसने आक्रमक सुरुवात केली आहे. त्यामुळे बेंगळुरूने ४ षटकात बिनबाद ५६ धावा केल्या.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : बेंगळुरूच्या चिन्नास्वामीवर हैदराबादने रचला नवा इतिहास, आयपीएलमधील उभारला सर्वात मोठा स्कोअर

क्लासेन बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या अब्दुल सामदनेही आक्रमक खेळ केला. त्यामुळे हैदराबादने २० षटके संपले तेव्हा ३ बाद २८७ धावा केल्या. या आयपीएल इतिहासातील एका डावात संघाने उभारलेल्या सर्वोच्च धावा ठरल्या आहेत.

यापूर्वीही हा विक्रम हैदराबादच्या नावावर होता. हैदराबादने याच हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध २७७ धावा केल्या होत्या.

हैदराबादकडून २० षटकांनंतर मार्करम १७ चेंडूत ३२ धावांवर नाबाद राहिला, तर अब्दुल सामद १० चेंडूत ३७ धावांवर नाबाद राहिला.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : मार्करमला मिळाले जीवनदान

१८ व्या षटकात यश दयालने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर रिस टोप्लीने ए़डेन मार्करमचा झेल घेतला होता. मात्र हा चेंडू नो बॉल ठरला, त्यामुळे १८ धावांवर असलेल्या मार्करमला जीवनदान मिळाले.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : धोकादायक हेन्रिक क्लासेन अर्धशतकानंतर आऊट, पण हैदराबादची अडीचशेच्या धावसंख्येकडे वाटचाल

अर्धशतकानंतरही क्लासेनने त्याचा आक्रमक अंदाज कायम ठेवला होता, मात्र १७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लॉकी फर्ग्युसनने त्याचा अडथळा दूर केला. फर्ग्युसनने टाकलेल्या फुलटॉसवर क्लासेनने मोठा फटका खेळला, मात्र बॅकवर्ड पाँइंटला विजयकुमार वैशाखने त्याचा अफलातून झेल घेतला. त्यामुळे क्लासेनला ३१ चेंडूत २ चौकार आणि ७ षटकारांसह ६७ धावा करून माघारी परतावे लागले.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : ट्रेविस हेडपाठोपाठ क्लासेननेही दाखवला 'क्लास', 23 चेंडूत झळकावली फिफ्टी

ट्रेविस हेड बाद झाल्यानंतरही हेन्रिक क्लासेनने धावांची गती कमी होऊ दिली नाही. त्यानेही मोठे शॉट्स खेळताना २३ चेंडूत अर्धशतक केले. त्यामुळे १५ षटकातच हैदराबादने २०० धावांचा टप्पा पार केला.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : बेंगळुरूने सोडला निश्वास; तुफानी शतकी खेळी केल्यानंतर हैदराबादचा ट्रेविस हेड आऊट

ट्रेविस हेडला शतकानंतर बाद करण्यात बेंगळुरूकडून पदार्पण करणाऱ्या लॉकी फर्ग्युसनला यश मिळाले. त्याने १३ व्या षटकात हेडला नकल बॉलवर बाद केले. त्याचा अप्रतिम झेल फाफ डू प्लेसिसने घेतला.

हेडने ४१ चेंडूत १०२ धावांची खेळी केली. या खेळीत तयाने ९ चौकार आणि ८ षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर हेन्रिक क्लासेनला साथ देण्यासाठी एडेन मार्करम आला आहे.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : ट्रेविस हेडचे खणखणीत शतक; अवघ्या 12 व्या ओव्हरमध्येच हैदराबाद 150 धावा पार

अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतरही ट्रेविस हेडने आपली लय कायम ठेवताना बेंगळुरूच्या गोलंदाजांवर वर्चस्व ठेवले. त्याने १२ व्या षटकात चौकार ठोकत त्याच्या शतकाला गवसणी घातली. हेडने अवघ्या ३९ चेंडूत त्याचे शतक केले.

त्यामुळे हे आयपीएल इतिहासातील चौथे सर्वात जलद शतक ठरले, तर १७ व्या हंगामातील सर्वात जलद शतक ठरले आहे. त्याच्या या खेळीमुळे १२ षटकात हैदराबादने १ बाद १५८ धावा केल्या.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : अखेर बेंगळुरूला मिळाले पहिले यश, अभिषेक शर्मा 'इतक्या' धावांवर बाद

सनरायझर्स हैदराबादने ८ व्या षटकाच्या आतच १०० धावांचा टप्पा पार केला होता. परंतु, ९ व्या षटकात रिस टोप्लीने बेंगळुरूला पहिले यश मिळवून दिले. त्याने टाकलेल्या या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अभिषेक शर्माने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.

परंतु, लॉकी फर्ग्युसनने त्याचा झेल घेतल्याने त्याला २२ चेंडूत ३४ धावा करून माघारी परतावे लागले.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : पॉवर-प्लेमध्ये ट्रेविस हेडचा बेंगळुरूच्या गोलंदाजांवर हल्लाबोल; 20 चेंडूतच झळकावलं अर्धशतक

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादकडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. हेडने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्विकारला, त्याला अभिषेकने चांगली साथ दिली.

हेडने पॉवर-प्लेच्या ६ षटकांच्या आतच हेडने २० चेंडूत अर्धशतक झळकावले. पॉवर-प्लेच्या ६ षटकांत हैदराबादने बिनबाद ७६ धावा केल्या. अभिषेक २३ धावांवर आणि हेड ५२ धावांवर नाबाद आहे.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : असे आहेत दोन्ही संघांचे प्लेइंग-11

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, सौरव चौहान, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, विजयकुमार वैशाख, रीस टोप्ली, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल

  • इम्पॅक्स प्लेअर सब्स्टिट्यूट पर्याय - सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, स्वप्निल सिंग, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा

सनरायझर्स हैदराबाद: ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडेन मार्कराम, नितीश रेड्डी, हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन

  • इम्पॅक्स प्लेअर सब्स्टिट्यूट पर्याय - उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : डू प्लेसिसने जिंकला टॉस, प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बेंगळुरूने मोठे बदल केले आहेत.

बेंगळुरूचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे. याशिवाय मोहम्मद सिराजलाही या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.

याशिवाय सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने सांगितले की त्यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : लॉकी फर्ग्युसनचे बेंगळुरूकडून पदार्पण

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन या सामन्यातून पदार्पण करणार आहे. त्याला पदार्पणाची कॅप देण्यात आली आहे.

IPL 2024 RCB vs SRH Live Score : हैदराबादचा सामना बेंगळुरूशी! किता वाजता रंगणार थरार?

बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. तर सायंकाळी सात वाजता नाणेफेक होईल.

Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Live Scorecard :

इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत सोमवारी (15 एप्रिल) 30 वा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.

आयपीएल 2024 च्या विजेतेपदाच्या शर्यतीत राहण्यासाठी आरसीबीसाठी विजय खूप महत्त्वाचा आहे. आयपीएल 2024 च्या पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. त्यांना 6 पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. गेल्या 4 सामन्यांत तो पराभूत झाला आहे.

त्याच वेळी, सनरायझर्स हैदराबाद आयपीएल 2024 च्या ताज्या पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्याने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Atul Bhatkhalkar Won Kandivali East Assembly Election : कांदिवली पूर्व विधानसभेत बीजेपीच्या अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक !

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

SCROLL FOR NEXT