Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders  esakal
IPL

SRH vs KKR : रिंकू - राणा जोडीची झुंजार खेळी, हैदराबादच्या गोलंदाजांचीही सांघिक कामगिरी

अनिरुद्ध संकपाळ

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders : नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने सनराईजर्स हैदराबादसमोर विजयासाठी 172 धावांचे आव्हान ठेवले. केकेआरकडून रिंकू सिंहने 46 धावांची तर कर्णधार नितीश राणाने 42 धावांची खेळी केली. मात्र केकेआरच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. हैदराबादकडून मार्को जेनसेन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. यांना भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, एडिन माक्ररम आणि मार्कंडेय यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला मार्को जेनसेनने एकाच दोन धक्के दिले. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मार्केने रेहमनुल्ला गुराबजला शुन्यावर बाद केले. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर व्यंकटेश अय्यर देखील 7 धावांवर बाद झाला.

मार्कोने केकेआरला पाठोपाठ दोन धक्के दिल्यानंतर जेनस रॉय केकेआरचा डाव सावरत होता. मात्र त्याला कार्तिक त्यागीने 20 धावांवर बाद करत तिसरा धक्का दिला. यानंतर रिंकू सिंह आणि कर्णधार नितीश राणा यांनी केकेआरचा डाव सारवला. या दोघांनी भागीदारी रचत केकेआरला 9 षटकात 73 धावांपर्यंत पोहचवले.

केकेआरची टॉप ऑर्डर स्वस्तात माघारी झाल्यानंतर कर्णधार नितीश राणाने 42 धावांची खेळी केली तर रिंकू सिंहने 46 धावांचे मोलाचे योगदान दिले. त्याला आंद्रे रसेलने 15 चेंडूत 28 धावा करून चांगली साथ दिली. यामुळे केकेआर 130 धावांपर्यंत पोहचला. मात्र रिंकूला ही साथ शेवटपर्यंत मिळाली नाही. टॉप ऑर्डर प्रमाणे केकेआरच्या खालच्या फळीने देखील निराशा केली. सुनिल नरेन 1 तर शार्दुल ठाकूर 8 धावा करून बाद झाले. अखेर रिंकू सिंहने शेवटच्या षटकापर्यंत किल्ला लढवत केकेआरला 20 षटकात 9 बाद 171 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: ‘सकाळ’च्या डिजिटल पानाचा गैरवापर; एकावर गुन्हा दाखल, निवडणूक प्रचाराबाबतच्या खोडसाळपणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश! इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या १३४ कर्मचाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे; ‘या’ ८ मतदारसंघातील आहेत कर्मचारी

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

SCROLL FOR NEXT