Virat Kohli Rinku Singh  esakal
IPL

Virat Kohli Rinku Singh : थँक यू विराट भाई.... महत्त्वाच्या सल्ल्यासाठी अन् मोठ्या गिफ्टसाठी रिंकूने मानले किंग कोहलीचे आभार

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Rinku Singh : आयपीएल 2024 च्या 10 व्या सामन्यात कोलकाता नाईट राडयर्सने रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा 7 विकेट्सनी पराभव केला. आरसीबीकडून विराट कोहलीने 83 धावांची दमदार खेळी करत एकाकी झुंज दिली मात्र केकेआरने आरसीबीला 182 धावात रोखत हे टार्गेट 16.5 षटकात पार केले. केकेआरने यंदाच्या हंगामातील होम टीमच्या विजयाचा सिलसिला ब्रेक केला.

दरम्यान, सामना झाल्यावर विराट कोहलीने केकेआरचा डॅशिंग मॅच फिनिशर रिंकू सिंहची भेट घेतली. त्यावेळी विराट कोहलीने रिंकूला एक बॅट देखील गिफ्ट केली याचबरोबर रिंकूला सल्ला देखील दिला. केकेआरने या भेटीची क्षणचित्रे आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केली. याला केकेआरने 'हे नातं पाहताना आम्हाला आनंद होतो.' असे कॅप्शन देखील दिले.

रिंकू सिंहने देखील आपल्या सोशल मीडिया हँडलवरून रविराट कोहलीचे सल्ला आणि गिफ्टसाठी आभार मानले. विराट कोहली हा आयपीएलमधील एक स्टार खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 7444 धावा केल्या असून तो आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावा करणार फलंदाज ठरला आहे. त्याने ही कामगिरी 240 सामन्यात केली आहे. यात विराट कोहलीने 52 अर्धशतके आणि 7 शतके ठोकली आहेत.

रिंकू सिंह हा उत्तर प्रदेशमधून येतो. त्याने स्थानिक क्रिकेट वर्तुळात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये त्याने गुजरात टायटन्सविरूद्ध यश दयालच्या शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारत संघाला 200 धावांपेक्षाही जास्तीचे टार्गेट चेस करून दिलं होतं.

त्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता. त्याने भारताकडून टी 20 पदार्पण देखील केलं आहे. त्याने भारताकडून खेळताना 15 सामन्यात 176 च्या स्ट्राईक रेट आणि 89.00 च्या सरासरीने 365 धावा केल्या आहेत.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China Military Disengagement : भारत-चीन LAC वरून आज माघारी घेणार सैन्य; गलवान संघर्षानंतर बिघडली होती परिस्थिती

Green Spots on Mars : खुशखबर! मंगळावर पुन्हा सापडली जीवसृष्टीची चिन्हे; नासाच्या Perseverance Rover ने लाल ग्रहावर काय पाहिलं?

Reliance Industries: आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांचे शेअर्स दुप्पट होणार; गुंतवणूक करावी का?

Diwali 2024 Unhealthy Sweet: दिवाळीत विकल्या जाणाऱ्या 'या' 5 मिठाई सर्वात धोकादायक आहेत, तुम्हीही खात असाल तर वेळीच व्हा सावध

Census: लवकरच सुरू होणार जनगणना; लोकसभा मतदारसंघही बदलणार

SCROLL FOR NEXT