Rishabh Pant Fight Hard DC vs KKR IPL 2024 esakal
IPL

DC vs KKR : पंत लाज वाचवण्यासाठी झुंजला! तरी दिल्लीला केकेआरविरूद्ध कमी पडल्या 106 धावा

अनिरुद्ध संकपाळ

Rishabh Pant Fight Hard But KKR Defeat DC IPL 2024 : काही युद्धं ही जिंकण्यासाठी नाही तर फक्त प्रतिकार करण्यासाठी लढली जातात. आयपीएल 2024 मधला दिल्ली कॅपिटल्स अन् कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातला सामना देखील असाच होता. केकेआरनं पहिल्या 6 षटकात 88 धावा चोपून आधीच दिल्लीपासून हा सामना दूर नेला होता. मात्र तरी देखील दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतनं प्रतिकार केला. त्याच्या प्रतिकाराची वाहवा देखील झाली. मात्र केकेआरनं 106 धावांनी सामना खिशात टाकत आपला सलग तिसरा विजय दणक्यात साजरा केला.

पंतनं 25 चेंडूत 55 धावांची धडाकेबाज खेळी केली. ही खेळी इतकी धडाकेबाज होती की त्यातील 46 धावा फक्त चौकार अन् षटकारांनीच झाल्या होत्या. पंतनं आपली ही झुंजार खेळी 5 षटकार आणि 4 चौकारांनी सजवली. त्यानं ट्रिस्टन स्टब्ससोबत पाचव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी रचली. स्टब्जनं देखील 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र त्यानंतर दिल्लीच्या इतर फलंदाजांनी नांगी टाकली. दिल्लीचा डाव 18 व्या षटकात 166 धावात संपुष्टात आला.

केकेआरच्या वैभव अरोरा अन् मिचेल स्टार्कनं दिल्लीची अवस्था 4 बाद 33 धावा अशी करून ठेवली होती. त्यानंतर वरूण चक्रवर्तीनं धोकादायक पंत अन् सामना एकहाती जिंकून देण्याऱ्या स्टब्जला बाद करत केकेआरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

केकेआरच्या फलंदाजीबाबत बोलायचं झालं तर अशी फलंदाजी आयपीएलमध्ये फार कमी सामन्यात पहायला मिळते. विशाखपट्टणम हे दिल्ली कॅपिटल्सचं सध्या होम ग्राऊंड आहे. मैदान तसं छोटं अन् खेळपट्टी आरसीबीच्या चिन्नास्वामीलाही लाजवेल अशी आहे. या स्टेडियमवर नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरतो. श्रेयस अय्यरनं इथंच बाजी मारली.

केकेआरनं नाणेफेक जिंकली अन् आपली धडाडणारी तोफ सुनिल नारायणला सलामीला धाडलं. या तोफेनं दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजाला हैरान करून सोडलं. बॉल कुठंही टाका तो प्रेक्षकांमध्ये पोहचवण्याची जबाबदारी सुनिलनं चोख बजावली.

नारायणनं 39 चेंडूत 85 धावा ठोकल्या. मात्र त्याच्या जोडीला आलेल्या अंगकृश रघुवंशीनं सर्वांच लक्ष आपल्याकडं वेधलं. त्यानं 25 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. नारायणच्या खांद्याला खांदा लावून त्यानं दिल्लीच्या तगड्या गोलंदाजांना पाणी पाजलं. विशेष म्हणजे या 18 वर्षाच्या पोराचा हा पहिलाच आयपीएल सामना होता. त्या पहिल्याच सामन्यात त्यानं फास्ट बॉलरला स्विच हिट मारत आपला दम दाखवून दिला.

दिल्लीनं अखेर या दोन्ही फलंदाजांपासून आपला पिच्छा सोडवला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. जिथं नारायण अन् रघुवंशी सोडून गेले होते. तिथून रिंकू सिंह आणि आंद्रे रसेलनं सामना पुढं नेला. रिंकूनं तर 8 चेंडूत 26 धावा चोपत केकेआरला 17 व्या षटकातच 250 पार पोहचवलं.

रसेल अन् रिंकू खेळत असताना केकेआर सनराईजर्स हैदराबादचा 277 धावांची विक्रम मोडणार असं वाटत होतं. मात्र शेवटच्या षटकात इशांत शर्मानं टिच्चून मारा केला. त्यानं रसेलचा यॉर्कवर त्रिफाळा उडवला अन् केकेआरचं आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचं स्वप्न धुळीस मिळालं.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT