Rishabh Pant  esakal
IPL

Rishabh Pant IPL 2024 : कदाचित जुना पंत आपल्याला दिसणार नाही... गावसकर असं का म्हणाले?

Rishabh Pant IPL 2024 : ऋषभ पंतच्या गुडघ्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. सुनिल गावसकरांनी त्याच्या फिटनेसबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं.

अनिरुद्ध संकपाळ

Rishabh Pant IPL 2024 : ऋषभ पंत हा डिसेंबर 2022 पासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. दुखापतीतून सावरत ऋषभ पंत आता 2024 च्या आयपीएल हंगामात खेळणार आहे. एनसीएने त्याला फिट घोषित केलं आहे. मात्र गुडघ्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्यामुळे तो विकेटकिपिंग करणार की नाही हा मोठा प्रश्न आहे.

ऋषभ पंत कितपत फिट झाला आहे हे यंदाच्या आयपीएल हंगामातच दिसून येईल. त्यावर टी 20 वर्ल्डकपच्या संघात त्याची निवड होणार की नाही याचा निर्णय होईल. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी पंतबाबत महत्वाचे वक्तव्य केलं आहे.

'पंतसाठी हे पुनरागमन सोपे नसेल; परंतु तो गेल्या काही दिवसांत बराच सराव केलेला आहे. त्यामुळे आत्मविश्वास त्याला निश्चितच मिळालेला आहे, मात्र फलंदाजीतील पूर्वीचा सफाईदारपणा येण्यासाठी त्याला काही काळ थांबावे लागेल' असे गावसकर म्हणतात.

पंतच्या गुडघ्याला फारच गंभीर दुखापत झाली होती. यष्टीरक्षण करताना तुम्हाला प्रत्येक चेंडूवर उठाबशा कराव्या लागतात. फलंदाजी करतानाही गुडघ्यावरील जास्त ताण येतो, त्यामुळे आपल्याला आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात पूर्वीचा ऋषभ पंत कदाचित दिसणार नाही.

पंतची आयपीएलमधील उपस्थिती मात्र सर्वांसाठी लक्षवेधक असणार आहे, प्रेक्षकांची करमणूक करण्याचा विशेष गुण पंतकडे आहे. यष्टींच्या मागे यष्टीरक्षण करताना त्याची कायम ‘बडबड’ सुरू असते, त्यामुळे फलंदाजांची एकाग्रता बिघडू शकते; परंतु पंत जे बोलत असतो त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटते, असेही गावसकर यांनी सांगितले.

गावसकर पुढे म्हणाले, 'गुजरात संघाचे नेतृत्व करणारा शुभमन गिल कसे कर्णधारपद सांभाळतो, याचीही आपल्याला उत्सुकता असल्याचे गावसकर यांनी सांगितले. कर्णधारपदाचे दडपण गिल कसे सांभाळतो त्याचा फलंदाजीवर परिणाम होता का, शेवटी भारतीय संघाच्या भवितव्यासाठीही गिलमधील नेतृत्व गुण महत्त्वाचे ठरणार आहेत.'

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT