Rishabh Pant Banned For One IPL 2024 Match : आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा कर्णधार ऋषभ पंतला निलंबित करण्यात आले आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या स्लो ओव्हर रेटमुळे ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. यासोबत पंतला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ऋषभ पंतवर आता यापुढे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून दिल्लीसाठी हा मोठा धक्का आहे. याधी पंतने दोनदा स्लो-ओव्हर रेटमुळे लाखो रुपयांचा दंड भरला आहे.
आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, संघाचा कर्णधार एखाद्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्यास त्याला 12 लाख रुपयांचा दंड भरावा लागतो. आणि परत दुसऱ्यांदा दोषी आढळल्याने कर्णधाराला 24 लाख रुपये द्यावे लागले.
नियमांनुसार, जर एखाद्या संघाने तिसऱ्यांदा असे केले तर कर्णधाराला 30 लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्याची बंदी घालावी लागेल. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे केवळ पंतलाच नाही तर इतर सर्व खेळाडूंना 12 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 50 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
येत्या रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात सामना होणार आहे. एकीकडे, दिल्ली 12 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, आरसीबीचे सध्या 10 गुण आहेत आणि ते टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहेत.
दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील, तर त्यांना पुढचा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल. जर दिल्लीने विजय मिळवला तर त्याची टॉप-4 मध्ये येण्याची शक्यता वाढेल, ज्यामुळे RCB प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. पण ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्लीचा मार्ग सोपा दिसत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.