Rohit Sharma MI vs LSG IPL 2024 ESAKAL
IPL

Rohit Sharma : MI चा पराभव मात्र टीम इंडियाला दिलासा! शेवट गोड लखनौनेच केला

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Back In Form Against Lucknow Super Giants In IPL 2024 : मुंबई इंडियन्स अन् लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील लढत म्हणजे चाहत्यांच्या मनाला दिलासा देणाराच सामना होता. दोन्ही संघ प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर फेकले गेले होते. ते फक्त शेवट गोड करण्यासाठी लढत होते. त्यात मुंबई इंडियन्स होम ग्राऊंडवर तरी लखनौला मात देईल असं वाटत होतं. मात्र लखनौनं मुंबईविरूद्धचा स्कोअर 5 - 1 असा केला. केएल राहुलनं सहा सामन्यात मुंबईला पाचव्यांदा मात दिली.

जरी मुंबई हरली असली तरी टीम इंडियाला मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. कारण त्यांचा नेता फॉर्ममध्ये आलाय. रोहित शर्मानं 38 चेंडूत 68 धावा चोपून वर्ल्डकपपूर्वी बॅटिंग प्रॅक्टिस करून घेतली. दुसरीकडं हार्दिककडूनही तशीच काहीशी अपेक्षा होती. मात्र पांड्या ना धड चांगली बॉलिंग करू शकला ना त्याला आपली बॅटची धार वाढवता आली.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर टॉस मुंबईनं जिंकला. पहिल्या 10 ओव्हरमध्ये लखनौची अवस्था 3 बाद 69 रन्स अशी केली. मात्र त्यानंतर लखनौनं टुकार कॅप्टन्सीचा फायदा घेत पुढच्या 10 षटकात 3 विकेट्स गमावून तब्बल 145 धावा ठोकल्या.

लखनौचा कर्णधार केएल राहुलनं संथ सुरूवात केली. त्यामुळं लखनौची गाडी देखील पहिल्या गिअरमध्येच पुढं सरकत होती. त्यात पियुष चावलानं स्टॉयनिस अन् हुड्डाची शिकार करत लखनौची चाल अजून मंद केली. केएल देखील धावांसाठी संघर्ष करत होता. मात्र निकोलस पूरन क्रिजवर आला अन् त्यानं मुंबईच्या बॉलर्सविरूद्ध आपला दांडपट्टा फिरवला. त्यानं 29 चेंडूत 74 धावा ठोकल्या.

निकोलसनं आपली ही खेळी 8 सिक्स अन् 5 बाऊड्री मारत सजवली. दुसरीकडं कर्णधार केएलनं अर्धशतकी खेळी केली. त्यानं 55 धावा करत चांगली साथ दिली. तो शेवटपर्यंत खेळला मात्र त्यानं 55 रन्स करण्यासाठी तब्बल 41 बॉल घेतले. इथंच समजलं की केएल राहुलला सिलेक्टर्सनी का डावललं.

लखनौनं 20 षटकात 6 बाद 214 धावा ठोकल्या. यंदाच्या हंगामात मुंबई चेस करताना दोनवेळा 240 धावांच्या पार पोहचली होती. वाटलं होतं आज मुंबई असंच काही करू शकते. मुंबईनं सुरूवात देखील धडाकेबाज केली. रोहित शर्मानं आपण अजूनही चांगल्या टचमध्ये असल्याचं दाखवून दिलं. त्यात पावसानं मुंबईचा खेळ बिघडवला.

थोडाच पडलेल्या पावसामुळं पिच थोडं सॉफ्ट झालं. त्याचा फायदा लखनौच्या बॉलर्सनी उचलला. मुंबईने 8 षटकात 88 धावा चोपल्या होत्या. मात्र नवीन उल हक, कृणाल पांड्या अन् रवी बिश्नोईनं मुंबईची टॉप ऑर्डर पॅव्हेलियनमध्ये धाडली. सूर्याला तर भोपळाही फोडता आला नाही. रोहित 38 बॉलमध्ये 68 धावा करून बाद झाला.

त्यानंतर मुंबईची गळती सुरू झाली. हार्दिककडून अपेक्षा होत्या मात्र 16 धावांच छोटंस योगदान देत हार्दिकनं बॉलिंग पाठोपाठ बॅटिंगमध्ये देखील निराशा केली. वधेराही एक धावांची भर घालून परतला.

वाटलं आता मुंबईच्या पराभवाची औपचारिकताच बाकी आहे. मात्र नमन धीरनं मुंबईला आपला दम दाखवून दिला. त्यानं 25 चेंडूत अर्धशतकी खेळी केली अन् सामना जवळ आणला. मात्र लखनौनं शेवटच्या षटकात नवीननं चांगला मारा करत 15 धावा दिल्या. मुंबई 18 धावांनी हरली अन् लखनौनं शेवट गोड केला.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT