Rohit Sharma | IPL 2024 X
IPL

Rohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या बसचा हिटमॅन सारथी! चाहत्यांसमोरच स्विकारली नवी भूमिका, Video Viral

Mumbai Indians: रोहित शर्मा बनला चक्क मुंबई इंडियन्सचा बसचा ड्रायव्हर, Video होतोय तुफान व्हायरल

Pranali Kodre

Rohit Sharma Viral Video: मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा त्याच्या आक्रमक फलंदाजीबरोबरच त्याच्या विनोदबुद्धीसाठीही ओळखला जातो. त्याचा हा मजेशीर स्वभाव पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

रोहित सध्या मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएल 2024मध्ये खेळत आहे. याचदरम्यानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित चक्क संघाच्या बस ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसला आहे.

व्हिडिओमध्ये दिसते की रोहित मुंबई इंडियन्सच्या संघाच्या बसमध्ये चढला आणि बस चालवण्याच्या हेतूने ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसला, तो बस चालवण्याची माहिती विचारतानाही दिसला. यावेळी मुंबई संघातील सदस्य एकएक करत बसमध्ये चढत होते, तेही रोहितने घेतलेल्या या नव्या भूमिकेची मजा घेताना दिसले.

यावेळी बस समोर उभ्या असलेल्या चाहत्यांना रोहित हातवारे करून बाजूला व्हा, असा इशारा करतानाही दिसला. त्याचबरोबर त्याने हे क्षण फोनमध्येही कैद केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, रोहित शर्मा यंदा मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर फलंदाज म्हणून खेळत आहे. या हंगामापूर्वी त्याच्याऐवजी या संघाचे नेतृत्वपद हार्दिक पांड्याकडे देण्यात आले आहे.

हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईने यंद्याच्या हंगामात पहिले तीन सामने गमावल्यानंतर घरच्या मैदानावर दोन्ही सामने जिंकले आहेत. आता त्यांचा सहावा सामना चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध होणार आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यात 14 एप्रिलला वानखेडे स्टेडियवर सामना होणार आहे.

नव्या कर्णधारांच्या पर्वाला सुरुवात

आयपीएल 2024 पूर्वी केवळ मुंबई संघातच नाही, तर चेन्नई संघातही नेतृत्वबदल झाला आहे. एमएस धोनीने आयपीएल 2024 पूर्वी चेन्नईचे नेतृत्वपद सोडत ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवली आहे.

त्यामुळे यंदा मुंबईचे नेतृत्व हार्दिक, तर चेन्नईचे नेतृत्व ऋतुराज करत आहे. त्यामुळे यंदा मुंबई-चेन्नई यांच्यातील सामन्यात हार्दिक आणि ऋतुराज या दोन कर्णधारांकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT