IPL 2023 Mumbai Indians Rohit Sharma : सलग दोन सामन्यांत दोनशेपेक्षा अधिक धावा देणाऱ्या मुंबई इंडियन्सचा आज गुणतक्त्यात अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना होत आहे. कमालीची आक्रमक फलंदाजी करत असलेल्या राजस्थानचा अश्व रोखून मुंबई संघातील खेळाडू कर्णधार रोहित शर्माला वाढदिवसाची भेट देणार का, याची उत्सुकता वानखेडे स्टेडियमवर असेल.
गत स्पर्धेतील उपविजेते राजस्थान यंदाही त्याच फॉर्मात खेळत आहे. दोन दिवसांपूर्वीच्या सामन्यात चेन्नईचा एकतर्फी पराभव करून त्यांचे अव्वल स्थान राजस्थानने मिळवले. आता आयपीएल लीगचा दुसरा टप्पा सुरू झालेला असल्यामुळे हे पहिले स्थान ते सहजासहजी सोडणार नाहीत. आत्मविश्वास त्यांच्या बाजूने आहे तर मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही प्रामुख्याने गोलंदाजीत चाचपडत आहे.
मुंबई इंडियन्स संघासाठी गोलंदाजी ही फार मोठी समस्या राहिली आहे. यावर तोडगा त्यांना काढता आलेला नाही. त्यातच आता गेल्या सामन्यात द्विशतकी धावा करून चेन्नईवर ३२ धावांनी सहज विजय मिळवला होता. म्हणजेच फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही त्यांनी प्रभाव पाडला होता.
मुंबईची परिस्थिती मात्र नेमकी उलटी आहे. याच वानखेडेवर पंजाब किंग्जविरुद्ध त्यांनी अखेरच्या ३० चेंडूंत ९६ धावां तर गुजरातविरुद्ध झालेल्या सामन्यात अखेरच्या २४ चेंडूंत ७० धावा दिल्या होत्या.
गोलंदाजीत पर्याय कमी
जसप्रीत बुमरा, रिचर्डसन दुखापतीमुळे अगोदरच स्पर्धेबाहेर गेले आहेत. जोफ्रा आर्चर अनफिट अधिक आहे, अशा परिस्थितीत मुंबईकडे आता वेगवान गोलंदाजीचे पर्याय फार कमी आहेत. त्यात अर्जुन तेंडुलकरला दोनच षटके देण्यात येत आहेत. अखेरच्या षटकांत (डेथ ओव्हर) अर्जुनला गोलंदाजी देण्याचे धाडस रोहित शर्मा करत नाही, जेव्हा त्याला गोलंदाजी दिली होती तेव्हा त्याने एकाच षटकांत ३१ धावा दिल्या होत्या. त्यामुळे रोहित शर्माला आता आहे त्याच गोलंदाजांकडून मार्ग शोधावा लागणार आहे.
सुमार गोलंदाजीमुळे धावांचा बोजाच एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा परिणाम मुंबईच्या फलंदाजीवर होत आहे. रोहित शर्मा आणि ईशान शर्मा यापैकी एक सलामीवीर बाद झाला तर मधल्या फळीवर दडपण वाढत आहे. सूर्यकुमार यादव करत असलेले प्रयत्न अपुरे ठरत आहेत. टीम डेव्हिड आणि कॅमेरुन ग्रीन यांच्याकडे सातत्याचा अभाव दिसून येत आहे. तिलक वर्मा सूर्यकुमार आणि टीम डेव्हिड, ग्रीन एकाच वेळी फॉर्मात येण्याची मुंबई संघाला नितांत गरज आहे,
जयस्वालच्या फलंदाजीवर लक्ष
राजस्थानकडे यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर असे सलामीवीर आहेत. अनुभवात बटलर कितीही मोठा असला तरी यशस्वी जयस्वाल कमालीचा प्रभावी आहे. यशस्वी मूळचा मुंबईचा खेळाडू आहे. वानखेडे स्टेडियम त्याच्यासाठीही घरचे मैदान आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात त्याच्या फलंदाजीवर अधिक लक्ष असेल. राजस्थानचा संघ चांगली प्रगती करत असला तरी त्यांचा कर्णधार संजू सॅमसनला प्रभाव पाडता आला नाही. भक्कम सलामीचा फायदा त्याला घेता आलेला नाही. मुंबई संघाची एकूणच गोलंदाजी पाहता आज सॅमसनला फॉर्मात येण्याची संधी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.