Rohit Sharma | Mumbai Indians | IPL 2024 Sakal
IPL

Rohit Sharma: दिल्लीविरुद्ध रो'हिट'! आजपर्यंत कोणत्याच भारतीयाला न जमलेला विक्रम केला नावावर

IPL 2024, MI vs DC: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना रोहितने 49 धावांची खेळी करत मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma Record: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. या सामन्यात मुंबईने 29 धावांनी विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रोहित शर्माने मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने 27 चेंडूत 49 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याची ही खेळी विक्रमीही ठरली.

या खेळीदरम्यान रोहितने टी20 क्रिकेटमध्ये 1500 व्यांदा चेंडू सीमापार करण्याचा म्हणजेच 1500 बाऊंड्री मारण्याचा विक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय ठरला.

आत्तापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 1500 बाउंड्री कोणत्याच भारतीय क्रिकेटपटूला मारता आलेल्या नाहीत. त्याच्यापाठोपाठ विराट कोहलीने 1486 बाऊंड्री मारल्या आहेत.

दरम्यान 7 एप्रिलपर्यंत टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बाऊंड्री मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर ख्रिस गेल आहे. त्याने 2196 बाऊंड्री मारल्या आहेत.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बाऊंड्री मारणारे क्रिकेटपटू (आकडेवारी 7 एप्रिलपर्यंत)

  • 2196 - ख्रिस गेल

  • 1855 - ऍलेक्स हेल्स

  • 1673 - डेव्हिड वॉर्नर

  • 1670 - कायरन पोलार्ड

  • 1557 - ऍरॉन फिंच

  • 1503 - रोहित शर्मा

रोहितच्या दिल्लीविरुद्ध 1000 धावा

रोहितने या खेळीदरम्यान दिल्लीविरुद्ध 1000 धावाही पूर्ण केल्या. त्याने यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धही 1000 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो आयपीएलमध्ये दोन संघांविरुद्ध 1000 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तिसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम केवळ डेव्हिड वॉर्नर आणि विराट कोहलीला करता आला आहे.

वॉर्नरने पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांविरुद्ध प्रत्येकी 1000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच विराटने दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांविरुद्ध आयपीएलमध्ये 1000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध 1000+ धावा करणारे क्रिकेटपटू

  • 1134 धावा - डेव्हिड वॉर्नर (विरुद्ध पंजाब किंग्स)

  • 1093 धावा - डेव्हिड वॉर्नर (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स)

  • 1057 धावा - शिखर धवन (विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स)

  • 1040 धावा - रोहित शर्मा (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स)

  • 1026 धावा - रोहित शर्मा (विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स)

  • 1030 धावा - विराट कोहली (विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स)

  • 1006 धावा - विराट कोहली (विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT