Rohit Sharma Give Center Chair to Dewald Brevis  ESAKAL
IPL

VIDEO : रोहितने आपली 'खुर्ची' ब्रेविसला देत जिंकले चाहत्यांचे मन

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हे तसे साळढाळ व्यक्तीमत्व आहे. त्याच्या कॅज्युअल वागण्याचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. असाच एक किस्सा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) याच्याबरोबरही घडला. याबाबतचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत मुंबई इंडियन्सचे काही खेळाडू मुलांबरोबर व्हिडिओ कॉलिंगद्वारे संवाद साधत होते.

या व्हिडिओ कॉलिंगसाठी तीन खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील मध्यल्या खुर्चीवर (Chair) ब्रेविस बसला होता. दरम्यान तेथे रोहित आल्यानंतर ब्रेविस अस्वस्थ झाला आणि खुर्चीवरून उठून मधल्या खुर्चीवर रोहितला बसण्यासाठी सांगू लागला. तो आपल्या कर्णधाराला सांगत होता की मधली खुर्ची ही तुमच्यासाठी आहे. यावर मुंबईचा कर्णधाराने नाही नाही त्यावर तू बस असे म्हणत त्याला मधल्या खुर्चीवर बसवले.

यावेळी ब्रेविसच्या चेहऱ्यावर हास्य उमटले यावरून रोहित शर्माच्या या कृतीमुळे ब्रेविस हा प्रवाभित झाला असल्याचे जाणवले. सोशल मीडियावर देखील रोहितच्या या कृतीची जोरदार स्तुती होत आहे. डेवाल्ड ब्रेविसने यंदाच्या हंगामात आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 124 धावा केल्या आहेत. याचबरोबर त्याने गोलंदाजीतही कमाल दाखवत विराट कोहलीची विकेट घेतली होती.

मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी झालेली नाही. त्यांना प्ले ऑफमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. मात्र मुंबईच्या काही युवा खेळाडूंनी आपल्या पहिल्याच हंगामात चांगलेच प्रभावित केले. यात डेवाल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा या दोन फलंदाजांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात रोहित शर्माचा देखील फलंदाजीतला फॉर्म खराब राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT