Rohit Sharma T20 World Cup 2024 sakal
IPL

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Kiran Mahanavar

Rohit Sharma T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 नंतर लगेच 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचीही घोषणा करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत, सर्व खेळाडू आयपीएलमध्ये आपला फॉर्म शोधत आहेत, जेणेकरून ते चांगल्या लयीत वर्ल्ड कपमध्ये जाऊ शकतील. पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासोबत जे काही घडत आहे त्यामुळे बीसीसीआय आणि भारतीय चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.

टी-20 वर्ल्ड कपपूर्वी रोहित शर्माला झाले काय?

टी-20 वर्ल्ड कपसाठी निवडलेले भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही आयपीएलच्या या हंगामातची धमाकेदार सुरुवात केली, मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे.

मागील काही सामन्यात त्याच्या खेळात अचानक मोठी घसरण झाली. तो आता आयपीएलमध्ये धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे, ही टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी रोहित शर्माचे फॉर्ममध्ये येणे खूप महत्त्वाचे आहे.

रोहित शर्माच्या खेळात अचानक झाली घसरण

रोहित शर्माने आयपीएल 2024 च्या पहिल्या सात सामन्यांमध्ये 49.5 च्या सरासरीने 297 धावा केल्या होत्या, जो या फॉरमॅटमध्ये खूप चांगला आकडा मानला जातो. या काळात त्याचा स्ट्राइक रेटही 164.1 होता, जो वेगवान सुरुवात करण्यासाठी पुरेसा आहे.

मात्र यानंतर त्याच्या खेळात मोठा बदल पाहायला मिळाला. रोहितने आयपीएलच्या शेवटच्या 5 सामन्यांमध्ये 6.6 च्या सरासरीने 6,8,4,11 आणि 4 धावा केल्या आहेत, हा आकडा खूपच खराब आहे. या 3 सामन्यात त्याने केवळ 33 धावा केल्या आहेत आणि स्ट्राईक रेट देखील 94.3 आहे.

रोहितची टी-20 कारकीर्द

रोहित शर्माने टीम इंडियासाठी आतापर्यंत 151 टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 31.79 च्या सरासरीने 3974 धावा केल्या आहेत. ज्यात 29 अर्धशतके आणि 5 शतकांचा समावेश आहे.

त्याच वेळी, टी-20 वर्ल्ड कप 2022 पासून रोहित शर्माने फक्त 3 टी-20 सामने खेळले आहेत, जे त्याने आयपीएल 2024 पूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध खेळले होते. या 3 सामन्यात त्याने 121 धावा केल्या आणि दोनदा खातेही उघडता आले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT