Rohit Sharma Meet Rinku Singh MI vs KKR IPL 2024 esakal
IPL

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Meet Rinku Singh MI vs KKR IPL 2024 : टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर दोन दिवसांनी आज रोहित शर्मा आणि निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित आगरकरने रिंकू सिंहला संघातून का वगळले याबद्दल स्पष्टीकरण दिलं.

रिंकूला यंदाचा आयपीएल हंगाम चांगला गेलेला नाही. मात्र त्यानं आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात 89 च्या सरासरी आणि 172 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत. तरीसुद्धा निवडसमितीने त्याला 15 च्या संघात स्थान न देता स्टँड बायमध्ये ठेवलं. तो संघासोबत वेस्ट इंडीजला जाणार आहे. मात्र त्याला संघात खेळता येणार नाहीये.

दरम्यान, रोहित शर्माने आज वानखेडे स्टेडियमवर रिंकू सिंहची भेट घेतली. आयपीएलच्या सामन्यात केकेआर आणि मुंबई इंडियन्स एकमेकांना भिडणार आहेत. या सामन्यापूर्वी रिंकू आणि रोहित आज सरावासाठी मैदानावर आले होते. केकेआरने या दोघांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकरने रिंकूला संघात न घेण्याबद्दल सांगितले की, 'हा निर्णय सर्वात अवघड होता. यात रिंकूची कोणतीही चूक नाही. हा संघाच्या कॉम्बिनेशनचा विषय आहे. आम्हाला वाटलं की रोहितला अतिरिक्त फिरकीपटू दिला पाहिजे. रिंकू हा संघात स्थान मिळवण्याच्या अगदी जवळ होता. त्याचे स्टँड बाय खेळाडूंमधील स्थान हे अधोरेखित करतं.'

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT