मुंबई : मुंबईत रस्त्यापासून ते स्टेडियपर्यंत चोहोबाजूंनी सर्वत्र आवाज रोहित शर्माचाच असल्याचे चित्र सोमवारी दुपारपासून तयार झाले होते. मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वात झलेला बदल अनेक क्रिकेट चाहत्यांना पटलेला नाही, त्यामुळे हार्दिकला विरोध आणि रोहितचे समर्थन असे वातावरण वानखेडे स्टेडियमवर तयार झाले होते; मात्र रोहित शून्यावर बाद होताच एकदम सन्नाटा पसरला.
मुंबई इंडियन्सचे खेळाडू वानखेडेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये निवासास आहेत. आजच्या सामन्यासाठी खेळाडूंची गाडी स्टेडियममध्ये सायंकाळी पाच वाजता येत असताना मरिन्स लाईन्सवर दुतर्फा तुफान गर्दी होती; पण यातून एकच सूर उमटत होता तो रोहित शर्माचा. आयपीएल असली की खेळाडूंच्या नावाच्या जर्सी रस्त्यांवर विकल्या जात असतात. त्यात सर्व प्रमुख खेळाडूंच्या नावाच्या जर्सी असतात. आज मात्र चित्र अपवादात्मक होते. केवळ रोहितच्या जर्सीलाच मागणी होती. काहींकडे तर हार्दिकची जर्सी विक्रीलाही नव्हती.
स्टेडियममध्ये सामन्याअगोदर खेळाडू सराव करत होते. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढू लागली तसा त्यांचा आवाजही वाढू लागला. नाणेफेकीची वेळ झाली आणि हार्दिक तेथे पोहोचला. मोठ्या स्क्रिनवर त्याची लाईव्ह छबी दाखवण्यात येताच रोहित... रोहितचा गलका झाला. याप्रसंगी जणू काही आपल्या आजूबाजूला वेगळे घडत नसल्याचा आविर्भाव दाखवत हार्दिक मात्र वावरत होता आणि उत्साह दाखवत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.