IPL 2023 royal challengers bangalore beat lucknow super giants  
IPL

IPL 2023 : बदला... बदला...! रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने राहुल ब्रिगेडला घरात घुसून लोळवले

Kiran Mahanavar

IPL 2023 : केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स पुन्हा एकदा आयपीएल 2023 मध्ये घरच्या मैदानावर पराभूत झाले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सोमवारी त्यांच्या घरच्या मैदानावर लखनौचा 18 धावांनी पराभव केला. यासह बंगळुरूने लखनौकडून घरच्या मैदानावर मिळालेल्या पराभवाचा बदला घेतला. लखनौचा घरच्या मैदानावर हा सलग तिसरा पराभव आहे.

आरसीबीचा 9 सामन्यांमधला हा 5वा पराभव आहे तर लखनौ सुपर जायंट्सचा 9 सामन्यांमधला 4वा पराभव आहे. यंदाच्या मोसमात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. पहिल्या सामन्यात सुपर जायंट्सने आरसीबीला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले. आरसीबी 10 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

127 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराजने सलामीवीर काइल मायर्सला झेलबाद करून सुपर जायंट्सला मोठा धक्का दिला. मायर्सला खातेही उघडता आले नाही. ग्लेन मॅक्सवेलने कृणाल पांड्याला विराट कोहलीच्या हातून झेलबाद करून सुपर जायंट्सला दुसरा धक्का दिला.

कृणाल 14 धावा करून बाद झाला. यानंतर 21 धावांवर आयुष बडोनी आणि 27 धावांवर दीपक हुड्डा यांची विकेट गमावून सुपर जायंट्सने अडचणीत आणले. निकोलस पूरननेही निराशा केली. सुपरजायंट्सने 38 च्या स्कोअरवर 5 विकेट गमावल्या होत्या.

करण शर्माने मार्कस स्टॉइनिसला आपला दुसरा बळी बनवले. स्टॉइनिसने 19 चेंडूत 13 धावा केल्या तर कृष्णप्पा गौतम 13 चेंडूत 23 धावा करून धावबाद झाला. आरसीबीकडून जोश हेजलवूड आणि कर्ण शर्मा यांनी दोन बळी घेतले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूची सुरुवात दमदार झाली. कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी रवी बिश्नोईने विराट कोहलीला बाद करत मोडली. कोहलीने 30 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या.

यानंतर विकेट पडण्याची एक माळ सुरू झाली. त्यानंतर कृष्णप्पा गौतमने अनुज रावतला (9) बाद केले. ग्लेन मॅक्सवेलला बिश्नोई एलबीडब्ल्यू. त्याला चार धावा करता आल्या. त्यानंतर अमित मिश्राने कर्णधार फाफ डुप्लेसिस (44 धावा) आणि सुयश प्रभुदेसाई यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

महिपाल लोमर 3 धावा, करण शर्मा 2 धावा, मोहम्मद सिराज खाते न उघडता बाद झाले. नवीन-उल-हकने तिघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 11 चेंडूत 16 धावा करून दिनेश कार्तिक धावबाद झाला. त्याचवेळी वनिंदू हसरंगा आठ धावा करून नाबाद राहिला.

लखनौकडून नवीन-उल-हकने तीन बळी घेतले. त्याचवेळी रवी बिश्नोई आणि अमित मिश्राने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT