RCB Dressing Room Sakal
IPL

IPL 2024: दुसऱ्या पराभवानंतर कसे होते RCB च्या ड्रेसिंग रुममधील वातावरण, फ्रँचायझीनेच केला Video शेअर

IPL 2024: दुसऱ्या पराभवानंतर RCB च्या ड्रेसिंग रुममध्ये कोच काय म्हणाले, पाहा Video

Pranali Kodre

Royal Challengers Bengaluru News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 10 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना झाला. या सामन्यात कोलकाताने 7 विकेट्सने विजय मिळवला.

दरम्यान, बेंगळुरूचा हा दुसरा पराभव आहे. तसेच घरच्या मैदानावर म्हणजेच एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना बेंगळुरूला पराभूत व्हावा लागला. त्यामुळे यंदाच्या हंगामात घरच्या मैदानात पराभूत होणारा बेंगळुरू पहिला संघ आहे.

बेंगळुरूच्या या पराभवानंतर ड्रेसिंग रुममधील वातावरणाचा व्हिडिओ सोशल अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये खेळाडू पराभवानंतर काहीसे नाराज दिसत आहेत. मात्र, बेंगळुरू संघाचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

त्यांनी यावेळी सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे कौतुकही केले. यात विराट कोहली, दिनेश कार्तिक, विजयकुमार वैशाख अशा खेळाडूंचा समावेश आहे.

तसेच त्यांनी असेही म्हटले की 'या सामन्यात एक गोष्ट खूप चांगली झाली, ती म्हणजे आपल्याला सातत्याने आव्हान दिले गेले. आपण किती अनुभवी आणि अननुभवी आहोत, याने काही फरक पडत नाही, आपण नेहमीच उपाय शोधले आहेत, हे महत्त्वाचे आहे.'

याबरोबर बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनेही या सामन्यातून शिकून पुढे जाण्याबद्दल भाष्य केले.

या सामन्यात बेंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 182 धावा केल्या होत्या. बेंगळुरूकडून विराट कोहलीने 59 चेंडूत सर्वाधिक 83 धावांची खेळी केली. तसेच कोलकाताकडून हर्षित राणा आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कोलकाताने 17 व्या षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला. कोलकाताकडून वेंकटेश आय्यरने 50 धावांची खेळी केली, तर सुनील नारायणने 47 धावा केल्या. बेंगळुरूकडून यश दयाल, मयंक डागर आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Rural Assembly Election 2024 : ‘लातूर ग्रामीण’ला यंदा तुल्यबळ लढत ,काँग्रेसविरुद्ध भाजप विधानसभा निवडणुकीच्या मैदानात

India vs South Africa: सूर्यकुमारच्या टीम इंडियाबरोबर गंभीर नाही, तर 'हा' दिग्गज कोच म्हणून जाणार दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला

Western Railway: मुंबईकरांचे पुन्हा हाल! पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Patan Election : पाटणमध्ये श्रीनिवास पाटील गटाची सत्त्वपरीक्षा! शंभूराज देसाई की हर्षद कदम? कोणाकडे झुकणार पारडे?

SCROLL FOR NEXT