Royal Challengers Bengaluru Vs Gujarat Titans ESAKAL
IPL

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

अनिरुद्ध संकपाळ

Royal Challengers Bengaluru Vs Gujarat Titans : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर-गुजरात टायटन्स यांच्यामध्ये उद्या (ता. ४) लढत रंगणार आहे. बंगळूरपेक्षा गुजरातला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी अधिक आहे. पण तरीही दोन्ही संघांसाठी आता विजयाला पर्याय नाही. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये रोमहर्षक लढत होण्याची दाट शक्यता आहे.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गुजरातने मागील दोन मोसमांत उल्लेखनीय कामगिरी केली. यंदा शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरातला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. गुजरातने दहा सामन्यांमधून फक्त चार सामन्यांमध्ये विजय मिळवले असून सहा सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

कर्णधार शुभमन गिल (३२० धावा) व साई सुदर्शन (४१८ धावा) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना चमक दाखवता आलेली नाही. डेव्हिड मिलर, रिद्धिमान साहा, शाहरुख खान यांच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. राहुल तेवतिया याला अधिक चेंडू खेळायला मिळालेले नाहीत. शिवाय इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमामुळे त्याला गोलंदाजीही मिळालेली नाही.

गुजरात संघ गोलंदाजी विभागातही सुमार कामगिरी करीत आहे. मोहम्मद शमी दुखापतीमुळे यंदाच्या मोसमात खेळू शकलेला नाही, पण त्याच्या अनुपस्थितीत मोहित शर्मा, उमेश यादव, संदीप वॉरियर यांना ठसा उमटवता आलेला नाही. मोहितच्या गोलंदाजीवर १०.९६ च्या सरासरीने, तर उमेशच्या गोलंदाजीवर १०.५५ च्या सरासरीने धावा काढण्यात आल्या आहेत.

गुजरातच्या गोलंदाजी विभागातील तुरुपचा एक्का म्हणजे राशीद खान. या मोसमात त्याने दहा सामन्यांमधून फक्त आठच फलंदाज बाद केले आहेत. तसेच आठच्या सरासरीने धावाही त्याच्या गोलंदाजीवर काढण्यात आल्या आहेत. एकूणच काय तर गुजरातला गोलंदाजी विभागात प्रचंड मेहनत करावी लागणार आहे.

विराटचा सुपर शो

बंगळूरच्या संघाने दहा सामन्यांमधून फक्त तीनच सामन्यांत विजय मिळवले आहेत, पण या संघामधून विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने चार अर्धशतके व एक शतकासह ५०० धावा फटकावल्या आहेत. विराटच्या सुपर शोनंतरही बंगळूरचा पाय खोलात गेला आहे. इतर फलंदाजांना अपयश आले आहे. फाफ ड्युप्लेसी (२८८ धावा), दिनेश कार्तिक (२६२ धावा), रजत पाटीदार (२११ धावा) यांच्याकडून निराशा झाली आहे. उर्वरित लढतींमध्ये या सर्व फलंदाजांना जबाबदारी ओळखून खेळ करावा लागणार आहे.

मोहम्मद सिराजकडून निराशा

बंगळूरच्या संघाला गोलंदाजी विभागातही अपयशाचा सामना करावा लागला आहे. मोहम्मद सिराज हा त्यांचा प्रमुख गोलंदाज, पण त्याला फक्त सहाच फलंदाज बाद करता आले आहेत. ९.५० च्या सरासरीनेही त्याच्या गोलंदाजीवर धावांची लूट करण्यात आली आहे.

टी-२० विश्‍वकरंडकासाठी भारतीय संघात त्याची निवड झाली आहे. त्यामुळे सिराजचे फॉर्ममध्ये येणे ही भारतीय संघासाठी आनंददायी बाब असणार आहे. कॅमेरुन ग्रीन, कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, ग्लेन मॅक्सवेल यांच्याकडून बंगळूर संघाला आशा आहेत.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde VIDEO: विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घेरलं, पैसे वाटल्याचा आरोप करत घातला राडा, काय घडलं नेमकं?

Latest Marathi News Updates : प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद

IND vs AUS: विराट धावांचा भुकेला, ऑस्ट्रेलियात दुपटीने वसुली करेल, माजी भारतीय कर्णधाराचा विश्वास

Dhananjay Munde : जातीपातीचा विचार न करता विजयसिंहांना संधी द्यावी; गेवराई येथे मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन!

Assembly Election : एवढ्या जागांवर होणार पवार विरुद्ध पवार, ठाकरे विरुद्ध शिंदे आणि भाजप विरुद्ध काँग्रेस लढत?

SCROLL FOR NEXT