IPL 2024 RR vs GT Live Score Updates News ESAKAL
IPL

IPL 2024 RR vs GT : शेवटच्या दोन षटकात खेळ पलटला; राशिद खान अन् राहुल तेवतियानं राजस्थान दिली मात

IPL 2024 Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Scorecard News : आयपीएल 2024 चा 24 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला.

Kiran Mahanavar

Rajasthan Royals vs Gujarat Titans :

गुजरात टायटन्सने अखेर राजस्थान रॉयल्सला पराभवाचं तोंड दाखवलंच! राजस्थान रॉयल्सने ठेवलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर राशिद खानने चौकार मारत सामना संपवला. गुजरातने राजस्थानचा 3 विकेट्सनी पराभव करत राजस्थानची सलग चार विजयाची मालिका खंडित केली.

गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिलने 72 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यानंतर राहुल तेवतियाने 11 चेंडूत 22 तर राशिद खानने 11 चेंडूत नाबाद 24 धावा चोपत शेवटच्या दोन षटकात सामना खेचून आणला. राजस्थानकडून कुलदीप सेनने 3 विकेट्स घेतल्या. मात्र 19 व्या षटकात त्याने 20 धावा देत स्वतःच्याच चांगल्या कामगिरीवर पाणी फेरलं. चहलने आपाल्या 150 व्या आयपीएल सामन्यात 2 विकेट्स घेतल्या.

राजस्थानकडून फलंदाजी रियान पराग अन् कर्णधार संजू सॅमसन यांनी दमदार खेळ केला. रियाननं 76 तर संजूने 38 धावांची खेळी केली.

IPL 2024 RR vs GT : शेवटच्या दोन षटकात खेळ पलटला; राशिद खान अन् राहुल तेवतियानं राजस्थान दिली मात

गुजरात टायटन्सला विजयासाठी 12 चेंडूत 35 धावांची गरज असताना राहुल तेवतिया आणि राशिद खान यांनी 19 व्या षटकात 20 तर 20 व्या षटकात 17 धावा चोपत गुजरातचा विजय खेचून आणला.

IPL 2024 RR vs GT Live Score : कर्णधार शुभमनची झुंज; राजस्थानविरूद्धचा सामन्यात रंगत

शुभमन गिलने अर्धशतकानंतर आपला गिअर बदलला. त्याने अश्विन आणि युझवेंद्र चहल सारख्या कसलेल्या फिरकपटूंविरूद्ध दमदार फलंदाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र चहलने गिलला 73 धावांवर बाद करत गुजरातला मोठा धक्का दिला.

IPL 2024 RR vs GT Live Score : कुलदीप सेनचा कहर! मॅथ्यू वेड अन् अभिनव आलं... आणि गेलं... गुजरातला तिसरा धक्का

कुलदीप सेनचा कहर पाहिला मिळत आहे. त्याने 11व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अभिनव मनोहरलाही आऊट केले. याआधी त्याने या षटकात मॅथ्यू वेडला आऊट केले होते. मनोहरला एकच धाव करता आली. विजय शंकर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. 11 षटकांनंतर गुजरातची धावसंख्या 83/3 आहे.

IPL 2024 RR vs GT Live Score :  गुजरातला मोठा धक्का

कुलदीप सेनने गुजरातला दुसरा धक्का दिला आहे. त्याने 11व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मॅथ्यू वेडला आऊट केले. सहा चेंडूत चार धावा करून तो बाद झाला. अभिनव मनोहर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला.

IPL 2024 RR vs GT Live Score : पॉवरप्ले संपला! गुजरातची चांगली सुरुवात... संजू विकेटच्या शोधात

पॉवरप्ले संपला आहे आणि गुजरात संघाचा स्कोअर 42/0 आहे. गिल आणि सुदर्शन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे.

IPL 2024 RR vs GT Live Score : कर्णधार संजू अन् रियानचा तांडव! राजस्थानने गुजरातला दिले 197 धावांचे लक्ष्य

राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 197 धावांचे लक्ष्य दिले आहे. संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी शानदार फलंदाजी केली. सॅमसनने 38 चेंडूत 68 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले.

रियानने 48 चेंडूत 76 धावा केल्या. त्याने 5 षटकार आणि 3 चौकार मारले. यशस्वी 24 धावा करून बाद झाला. जोस बटलरला केवळ 8 धावा करता आल्या. शिमरॉन हेटमायरने 5 चेंडूत 13 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने 1 चौकार आणि 1 षटकार मारला.

IPL 2024 RR vs GT Live Score : रियान परागचे शतक हुकले... राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का

मोहित शर्माने राजस्थानला तिसरा धक्का दिला. त्याने शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रियान परागला बाद केले ज्याने 76 धावा केल्या. त्याने संजू सॅमसनसोबत 130 धावांची भागीदारी केली. शिमरॉन हेटमायर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

IPL 2024 RR vs GT Live Score : रियानपाठोपाठ कर्णधार संजूनेही ठोकले तुफानी अर्धशतक!

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने आयपीएलच्या १७ व्या मोसमातील तिसरे अर्धशतक झळकावले आहे. त्याने 31 चेंडूत अर्धशतक ठोकले. यासह तो राजस्थानसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. सध्या तो 52 धावा करून नाबाद खेळत आहे.

IPL 2024 RR vs GT Live Score : रियान परागने ठोकले तुफानी अर्धशतक! राजस्थान रॉयल्सचा 'हल्ला बोल'

रियान परागने आयपीएलच्या १७ व्या मोसमातील तिसरे अर्धशतक झळकावले आहे. त्याने 34 चेंडूत अर्धशतक केले आहे. 15 षटकांनंतर संघाची धावसंख्या 134/2 आहे. रायन आणि सॅमसनमध्ये 92 धावांची भागीदारी झाली आहे.

IPL 2024 RR vs GT Live Score : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! जैस्वालपाठोपाठ बटलरही पॅव्हेलियनमध्ये

राशिद खानने राजस्थानला दुसरा धक्का दिला आहे. त्याने 42 धावांवर जोस बटलरला आऊट केले. टी-20 क्रिकेटमध्ये स्टार गोलंदाजाने इंग्लिश फलंदाजाला आपला बळी बनवण्याची ही पाचवी वेळ आहे. गेल्या सामन्यात नाबाद शतक झळकावणारा बटलर या सामन्यात केवळ आठ धावा करून बाद झाला. सहा षटकांनंतर संघाची धावसंख्या ४३/२ आहे.

IPL 2024 RR vs GT Live Score : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! यशस्वी जैस्वाल पॅव्हेलियनमध्ये

उमेश यादवने राजस्थानला पहिला धक्का दिला आहे. त्याने पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यशस्वी जैस्वालला आऊट केले. जैस्वालला फक्त 19 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 24 धावा करता आल्या. यशस्वी आणि बटलरमध्ये पहिल्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी झाली.

IPL 2024 RR vs GT Live Score : जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग-11

राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रायन पराग, रविचंद्रन अश्विन, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, नांद्रे बर्जर, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), विजय शंकर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, मोहित शर्मा.

IPL 2024 RR vs GT Live Score : जयपूरमध्ये पाऊस थांबला! गुजरातने जिंकली नाणेफेक

गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संघात दोन बदल करण्यात आले आहेत. केन विल्यमसनच्या जागी मॅथ्यू वेडला संधी मिळाली असून शरथच्या जागी अभिनव मनोहरचा संघात समावेश करण्यात आला आहे.

IPL 2024 RR vs GT Live Score : जयपूरमध्ये पाऊस थांबला! जाणून घ्या कधी सुरू होणार सामना

जयपूरमध्ये पाऊस थांबला असून मैदानावरून कव्हर काढण्यात आले आहेत. आता नाणेफेक 7:25 वाजता होईल, पहिला चेंडू 7:40 वाजता टाकला जाईल.

IPL 2024 RR vs GT Live Score : राजस्थानमध्ये तुफानी पाऊस सुरू... किती वाजता होणार टॉस?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यासाठी नाणेफेक विलंब होऊ शकते. मैदानावर रिमझिम पाऊस होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT