RR vs PBKS Live Streaming for IPL 2023 
IPL

RR vs PBKS IPL 2023 : दुसऱ्या विजयाची गुढी कोण उभारणार? राजस्थानसमोर पंजाबचा लागणार कस

RR vs PBKS IPL 2023: गुवाहाटीमधील लढतीत दोन्ही संघांचे दुसऱ्या विजयासाठी प्रयत्न

सकाळ ऑनलाईन टीम

RR vs PBKS IPL 2023 : आयपीएलच्या मागील मोसमात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या राजस्थान रॉयल्सने यंदाच्या मोसमाची सुरुवात विजयाने केली. आता गुवाहाटी येथे आज होणार असलेल्या लढतीत त्यांना पंजाब किंग्स संघाचा सामना करावयाचा आहे. याप्रसंगी उभय संघ या मोसमातील दुसऱ्या विजयाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहेत.

गुवाहाटी हे राजस्थान रॉयल्सचे घरचे मैदान असणार आहे. या मोसमातील पहिलाच सामना येथे होत आहे. राजस्थानच्या दोन लढती येथे होणार असून यामधील पहिली लढत आज पंजाबशी होईल. दुसरी लढत दिल्ली कॅपिटल्सशी ८ एप्रिल रोजी पार पडेल.

राजस्थानने पहिल्याच लढतीत सनरायझर्स हैदराबादचा ७२ धावांनी धुव्वा उडवला. या लढतीत यशस्वी जयस्वाल (५४ धावा), जॉस बटलर (५४ धावा), संजू सॅमसन (५५ धावा) यांनी धडाकेबाज फलंदाजी करीत प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

देवदत्त पडिक्कल व रियान पराग या फलंदाजांना मधल्या फळीत अपयश आले; पण शिमरोन हेटमायर याने अखेरच्या षटकात दे दणादण फटकेबाजी करीत राजस्थानला २०३ ही धावसंख्या गाठून दिली. (Latest Sport News)

राजस्थानचा गोलंदाजी विभागही भक्कम आहे. भारतीय संघातील दोन अव्वल दर्जाचे फिरकी गोलंदाज या संघात आहेत. रवीचंद्रन अश्‍विन व युझवेंद्र चहल यांच्या समावेशामुळे राजस्थानचा गोलंदाजी विभाग भक्कम होतो. पहिल्या लढतीत चहल याने चार, तर अश्‍विन याने एक फलंदाज बाद करीत आपली धमक दाखवून दिली.

या दोघांच्या दिमतीला ट्रेंट बोल्टच्या रुपात अनुभवी वेगवान गोलंदाजही राजस्थानच्या संघात आहे. बोल्ट यानेही दोन फलंदाज बाद करीत पहिल्या विजयाच चमक दाखवली. या तिघांसह के. सी. करियप्पा, कुलदीप सेन, नवदीप सैनी, मुरुगन अश्‍विन, ओबेड मॅकॉय, के. आसिफ हे गोलंदाजही संघात आहेत.

धवन, अर्शदीपकडून आशा

पंजाब किंग्सने सलामीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्स संघावर डकवर्थ लुईस नियमानुसार ७ धावांनी विजय मिळवला.

राजस्थानने मिळवलेल्या विजयासारखा हा एकतर्फी नव्हता; पण दोन गुण महत्त्वाचे होते. या लढतीत कर्णधार शिखर धवन, भनुका राजपक्षा यांनी फलंदाजीत, तर अर्शदीप सिंग याने गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली.

धवन व अर्शदीप या दोन भारतीयांकडून पंजाबला मोठ्या अपेक्षा आहेत. तसेच सॅम करण या इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूच्या कामगिरीवरही संघाला अवलंबून रहावे लागणार आहे.

लिव्हिंगस्टोन, रबाडाची प्रतीक्षा

पंजाब किंग्स संघाला दोन परदेशी खेळाडूंची प्रतीक्षा आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा हा नेदरलँडविरुद्धच्या मालिकेत खेळत होता. त्यामुळे आयपीएलमधील सुरुवातीच्या लढतीला तो मुकला.

तसेच इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून लियाम लिव्हिंगस्टोन याला तंदुरुस्तीचे सर्टिफिकेट देण्यात आले नाही. त्यामुळे तोही पहिल्या लढतीला मुकला. उद्याच्या लढतीत या दोघांचा पंजाबचा संघात समावेश झाल्यास त्यांच्यासाठी ही चांगली बाब ठरणार आहे.

  • आजची लढत : राजस्थान रॉयल्स - पंजाब किंग्स

  • ठिकाण - बारसापरा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी

  • वेळ - संध्या. ७.३० वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

SCROLL FOR NEXT