RR vs RCB IPL 2024 Faf Du Plessis Statement News Marathi sakal
IPL

RR vs RCB : विराटच्या शतकानंतरही RCBला कमी पडल्या धावा... फाफनं पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं?

आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीच्या शतकानंतरही आरसीबी संघाला सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

Kiran Mahanavar

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru : आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीच्या शतकानंतरही आरसीबी संघाला सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

सामन्यातील पराभवानंतर आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली खूपच निराश दिसत होता. या सामन्यात त्याने 72 चेंडूत 113 धावा केल्या आहेत. या पराभवानंतर संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसही निराश दिसला. अशा परिस्थितीत त्याने पराभवानंतर मोठे विधान केले आणि आपल्या संघाची कुठे चूक झाली हे सांगितले.

काय म्हणाले फाफ डु प्लेसिस?

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर फाफ डू प्लेसिस म्हणाला की, मला वाटले की 190 ही चांगली धावसंख्या होती, पण आम्ही आणखी 10-15 धावा जोडू शकलो असतो. त्यांच्या फिरकीपटूंनी मधल्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली, प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय चांगला होता. कारण नंतर दव पडल्यामुळे फलंदाजी सोपी झाली. विराट शेवटच्या टोकाला चांगला खेळत होता, ग्रीन पण मैदानात होता. पण शेवटच्या ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त धावा करायला पाहिजे होत्या. पण फिरकीपटूंविरुद्ध फटकेबाजी करणे कठीण होते.

जयपूरच्या खेळपट्टीबाबत फॅफने सांगितले की, दुसऱ्या डावात खेळपट्टी खूपच चांगली झाली होती, कारण चेंडू स्कीड करत होता. पहिल्या चार षटकांमध्ये आम्ही उत्कृष्ट खेळलो.

या सामन्यात फॅफने मॅक्सवेलला गोलंदाजी केली नाही. याबाबत विचारले असता, फॅफने सांगितले की, मॅक्सवेलला गोलंदाजी न करण्याचे कारण म्हणजे सर्व उजव्या हाताचे फलंदाज फलंदाजी करत होते, त्यामुळे सुरुवातीला तो डावखुरा फिरकीपटूकडे गेला.

तो पुढे म्हणाला की, या सामन्यात बचावात्मक असण्यात काही अर्थ नाही, आम्हाला विकेट्सची गरज होती. जैस्वालला आम्ही आऊट केले तेव्हा मला मॅक्सवेलकडे जाण्याची गरज वाटली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT