Ruturaj Gaikwad Fiance Utkarsha Pawar : आयपीएल 2023 संपल्यानंतर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा मैदानावर सर्वांसमोर पतीच्या पायाला स्पर्श करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिवाबा जडेजाच्या पाया पडत आहे, तेव्हा सीएसकेचा अष्टपैलू खेळाडू तिला मिठी मारतो. या व्हिडिओचे खूप कौतुक केले जात आहे.
पण या सगळ्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडची भावी पत्नी उत्कर्षा पवारचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये चेन्नई सुपर किंग्ज ट्रॉफी जिंकल्यानंतर उत्कर्षा मैदानावरच महेंद्रसिंग धोनीच्या पाया पडते आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू विक्रमी पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर आपल्या कुटुंबीयांसह आणि सहकाऱ्यांसोबत मैदानावर आनंद साजरा करताना दिसत आहेत. या विजयाबद्दल सहकारी खेळाडू आणि इतरांनी धोनीचे अभिनंदन केले. त्यानंतर उत्कर्षा तिथे येते. उत्कर्षाला पाहून धोनीने तिला मिठी मारली, त्यानंतर ती माहीच्या पाया पडते अन् तिचा आशीर्वाद घेते.
26 वर्षीय ऋतुराज गायकवाडची नववधू उत्कर्षा पवार हिचा धोनीबद्दलचा हा आदर चाहत्यांची मने जिंकत आहे. चाहते उत्कर्षाचे जोरदार कौतुक करत आहेत. आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टाइम्सचा 5 विकेट्सने पराभव करून ट्रॉफी जिंकली होती.
वृत्तानुसार, ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार 3 जून रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या मेंदी सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उत्कर्षा पवार ही देखील एक क्रिकेटर आहे, जी देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करते. उत्कर्षाने नोव्हेंबर 2021ला शेवटचा सामना खेळला होता.
चेन्नई सुपर किंग्ज सलामीवीराचा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023 फायनलसाठी राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. मात्र लग्नामुळे ऋतुराज संघातून बाहेर पडला असून त्याची जागा यशस्वी जैस्वालने घेतली. WTC फायनल लंडनमधील ओव्हल येथे 7 ते 11 जून दरम्यान खेळल्या जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.