Ruturaj Gaikwad on CSK Captaincy: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत सोमवारी (8 एप्रिल) झालेल्या 22 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. हा सामना जिंकत चेन्नईने घरच्या मैदानात म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियमवर अपराजित राहण्याचा विक्रम कायम ठेवला आहे.
चेनन्नईच्या या विजयात कर्णधार ऋतुराज गायकवाडने मोलाचा वाटा उचलला. फलंदाजीसाठी कठीण असलेल्या खेळपट्टीवर त्याने संयमी नाबाद अर्धशतकी खेळी केली. या सामन्यानंतर ऋतुराजने चाहत्यांचेही त्याला मिळालेल्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत.
चेन्नईचा 5 वेळचा आयपीएल विजेता कर्णधार एमएस धोनीने आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी नेतृत्वपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चेन्नईच्या नेतृत्वाची धूरा ऋतुराजकडे सोपवण्यात आली आहे. त्याचमुळे ऋतुराज यंदा चेन्नई संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे.
चेन्नई सुपर किंग्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ऋतुराज म्हणाला, 'सर्वांना हॅलो, मी ऋतुराज. मी इतक्या मोठ्या फ्रँचायझीचा कॅप्टन झाल्यापासून तुम्ही मला दिलेल्या प्रेमामुळे खरंच भारावलो आहे आणि मला तुमचे हे प्रेम आवडतंय.
जेव्हाही मी नाणेफेकीसाठी जातो, तेव्हा मला माही भाईला मिळायचा अगदी तसाच पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आत्तापर्यंत संघात जसे वातावरण होते आणि संघाचा वारसा आहे, तसाच तो कायम ठेवायचा आहे.'
'मी तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आभार मानतो. तुमच्या पाठिंब्यासाठीही धन्यवाद. अजूनही खूप सामने बाकी आहेत आणि ला आशा आहे की तुम्ही अशीच साथ देत राहाल आणि चिअर करत रहाल. धन्यवाद.'
ऋतुराजच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आयपीएल 2024 मध्ये आत्तापर्यंत 5 सामने खेळले आहेत. यातील 3 सामन्यात संघाने विजय मिळवला असून 2 सामन्यात पराभव स्विकारला आहे.
विशेष म्हणजे हे तिन्ही विजय चेपॉक स्टेडियमवर म्हणजेच घरच्या मैदानावर मिळवले आहेत. तसेच 2 सामने चेन्नईला प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर पराभूत व्हावे लागले आहेत. अद्याप आयपीएल 2024 मधील साखळी फेरीतील 9 सामने बाकी आहेत.
दरम्यान, ऋतुराजने कर्णधार झाल्यानंतर पहिल्यांदाच सोमवारी अर्धशतक केले. कोलकाताने दिलेल्या 138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने 58 चेंडूत नाबाद 67 धावांची खेळी केली. चेन्नईने हे 138 धावांचे आव्हान 17.4 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.