Sachin Tendulkar X/sachin_rt
IPL

Sachin Tendulkar: 'बाबा, मला तुमची रोज आठवण येते...', वडिलांच्या आठवणीत सचिन भावुक

Sachin Tendulkar Post: सचिन तेंडुलकरने त्याच्या वडिलांच्या आठवणीत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यांची रोज आठवण येत असल्याचे म्हटले आहे.

Pranali Kodre

Sachin Tendulkar Social Media Post: भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर रविवारी (26 मे) आपल्या वडिलांच्या आठवणीत भावूक झाला होता. त्याने वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या वडिलांची खास आठवण शेअर केला आहे.

सचिनचे वडील रमेश तेंडुलकर हे लेखक होते. त्यांचे 19 मे 1999 रोजी निधन झाले. त्यांचे निधन झाले, तेव्हा 26 वर्षीय सचिन इंग्लंडमध्ये वनडे वर्ल्ड कप खेळत होता.

आता त्यांच्या निधनाला 25 वर्षे झाल्यानंतर सचिनने मुंबई मराठी संग्रहालयाला भेट दिली आणि त्यावेळी तो त्याच्या वडिलांच्या आठवणीत हरवून गेला होता.

त्याने सोशल मिडिया पोस्ट करताना लिहिले की 'बाबा जाऊन 25 वर्षे झाले. पण आज त्यांच्या जुन्या खुर्चीजवळ उभं राहुन असं वाटलं की आजही ते इथे आहेत. मी तेव्हा फक्त 26 वर्षांचा होतो आणि आता मी 51 वर्षांचा आहे, आता मला आणखी स्पष्ट जाणवतं की त्यांनी माझ्या आणि इतरांच्या आयुष्यावर किती प्रभाव पाडला आहे.'

'त्यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त 43 वर्षांनी या ठिकाणाला भेट देणे खूप भावनिक होते. त्यांचे ज्ञान आणि दयाळूपणा आजही मला प्रेरणा देतो. मला प्रत्येकदिवशी तुमची आठवण येते बाबा. मला आशा आहे की तुम्ही जे संस्कार माझ्यावर केले, त्यांना मी सार्थ ठरवले असेल.'

ज्यावेळी रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले होते, त्यावेळी सचिन तातडीने भारतात परत आला होता. पण नंतर अंत्यसंस्कार झाल्यानंतर लगेचच तो पुन्हा इंग्लंडला वर्ल्ड कप खेळण्यासाठी गेला होता. त्याच्यासाठी ती स्पर्धा भावनिक ठरली होती.

सचिनने त्यानंतर केलेली शतकं त्याच्या वडिलांना समर्पित केली. सचिनने त्याच्या कारकिर्दीत 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 34357 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 100 शतके केली, तर 164 अर्धशतके केली. सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा, सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: ‘सकाळ’च्या डिजिटल पानाचा गैरवापर; एकावर गुन्हा दाखल, निवडणूक प्रचाराबाबतच्या खोडसाळपणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश! इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या १३४ कर्मचाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे; ‘या’ ८ मतदारसंघातील आहेत कर्मचारी

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

SCROLL FOR NEXT