Harshit Rana | Sachin Tendulkar Sakal
IPL

IPL 2024: 'क्लासेनने जवळपास विजय निश्चित केलेला, पण हर्षितने...', शेवटची ओव्हर पाहून मास्टर-ब्लास्टर सचिनही भारावला

Sachin Tendulkar Post: सनरायझर्स हैदराबाद विजयाच्या जवळ असताना हर्षित राणाने केलेल्या गोलंदाजीने कोलकाता नाईट रायडर्सला रोमांचक विजय मिळवून दिला. त्याच्या या गोलंदाजीबद्दल मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही कौतुक केले आहे.

Pranali Kodre

IPL 2024, KKR vs SRH: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत तिसरा सामना शनिवारी (23 मार्च) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. इडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने 4 धावांनी रोमांचक विजय मिळवला.

कोलकाताच्या या विजयात हर्षित राणानेही मोलाचा वाटा उचलला. त्याचे सचिन तेंडुलकरनेही कौतुक केले आहे.

कोलकाताने हैदराबादला 209 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून हेन्रिक क्लासेनने अखेरीस आक्रमक खेळ केला होता. त्याने 19 व्या षटकात तब्बल 3 षटकार मारले होते.

त्यामुळे हैदराबादला अखेरच्या षटकात केवळ 13 धावांची गरज होती. त्यावेळी कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने हर्षितकडे गोलंदाजी सोपवली. पण पहिल्याच चेंडूवर क्लासेनने षटकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला.

परंतु, हर्षितने लगेचच पुनरागमन केले. त्याने दुसऱ्या चेंडूवर एकच धाव दिली, तर तिसऱ्या चेंडूवर शाहबाज अहमदला बाद केले. यानंतरही त्याच्या चेंडूवर मार्को यान्सिनला एकच धाव काढता आली, तर पाचव्या चेंडूवर हर्षित राणाने टाकलेल्या चेंडूवर क्लासेनने मोठा फटका मारला. परंतु सुयश शर्माने क्लासेनचा सूर मारत शानदार झेल घेतला.

अखेर या सामन्यात हैदराबादला अवघ्या 4 धावांनी पराभव स्विकारावा लागला. क्लासेनने 29 चेंडूत 8 षटकारांसह 63 धावा केल्या.

दरम्यान, अखेरच्या षटकात हर्षित राणाने केलेल्या चांगल्या गोलंदाजीबद्दल सचिनने कौतुक करताना त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की 'आज आपण आंद्रे रसेल आणि क्लासेन यांच्या दोन अप्रतिम खेळी पाहिल्या.'

'फिल सॉल्टने सुरुवातीला आक्रमण केले, त्यानंतर रसेलने अफलातून फटकेबाजी केली. सनरायझर्स हैदराबाद विजयाच्या जवळ जाईल, याची हेन्रिक क्लासेनने काळजी केली होती; परंतु, शेवटच्या षटकात हर्षित राणाच्या धाडसी गोलंदाजीने सामना जिंकला.'

'त्याने त्या कठीण परिस्थितीत यॉर्करऐवजी खेळपट्टीवर स्थिरावलेल्या क्लासेनविरुद्ध धीम्या गतीचा चेंडू टाकला, ज्यामुळे तोही कदाचीत आश्चर्यचकीत झाला. खूपच मस्त.'

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताकडून सलामीवीर फिल सॉल्टने 40 चेंडूत 54 धावांची खेळी केली. तसेच रसेलने 25 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या. त्यामुळे कोलकाताने 20 षटकात 7 बाद 208 धावा केल्या होत्या. हैदराबादकडून नटराजनने 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 209 धावांचा पाठलाग करताना हैदराबादला 20 षटकात 7 बाद 204 धावा करता आल्या. कोलकाताकडून हर्षित राणाने 3 विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT