Sanju Samson Record: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत चौथा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात होत आहे. जयपूरला होत असलेल्या या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने शानदार अर्धशतक ठोकले. याबरोबरच त्याने खास विक्रमही केले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानने सलामीवीरांच्या विकेट्स लवकर गमावल्या होत्या. परंतु, कर्णधार सॅमसनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत शेवटपर्यंत संघाचा डाव सावरला.
त्याने तिसऱ्या विकेटसाठी रियान परागबरोबर (43) 93 धावांची भागीदारी केली, तर पाचव्या विकेटसाठी ध्रुव जुरेलबरोबर 43 धावांची नाबाद भागीदारी केली. त्यामुळे राजस्थानने 20 षटकात 4 बाद 193 धावा केल्या. सॅमसन 52 चेंडूत 82 धावा करून नाबाद राहिला. त्याने या खेळीत 3 चौकार आणि 6 षटकार मारले.
दरम्यान सॅमसनने आयपीएलमध्ये 80 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची ही सातवी वेळ आहे.
त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा 80 पेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये सॅमसनने चौथ्या क्रमांकावर संयुक्तरित्या असलेल्या रोहित शर्मा आणि सुरेश रैनाची बरोबरी केली आहे. त्यांनी 7 वेळा असा पराक्रम केल आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर विराट कोहली आहे. त्याने 15 वेळा आयपीएलमध्ये 80 पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा 80 पेक्षा अधिक धावांची खेळी करणारे क्रिकेटपटू (24 मार्च 2024 पर्यंत)
15 वेळा - विराट कोहली
12 वेळा - शिखर धवन
10 वेळा - केएल राहुल
7 वेळा - रोहित शर्मा
7 वेळा - सुरेश रैना
7 वेळा - संजू सॅमसन
दरम्यान, सॅमसनने आयपीएलमधील पहिला सामना खेळताना अर्धशतक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. विशेष म्हणजे त्याने गेल्या पाच हंगामात पहिल्या सामन्यात 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
अखेरच्या 5 आयपीएल हंगामात सॅमसनची पहिल्या सामन्यातील कामगिरी
74 धावा - विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 2020
118 धावा - विरुद्ध पंजाब किंग्स, 2021
55 धावा - विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 2022
55 धावा - विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 2023
नाबाद 82 धावा - विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 2024
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.